जागतिक महिला दिनाचे सफल आयोजन

खडकी : स्थानिक श्री धाबेकर कला महाविद्यालय, खडकी-अकोला येथे शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख व प्रभारी प्राचार्य डॉ. संगीता लोहकपुरे यांनी तीन दिवसीय जागतिक महिला दिनाचे आयोजन केले होते.

दिनांक ६ मार्च २०२१ रोजी “जागतिक महिला दिन” या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन केले गेले. यात महाविदयालयाच्या विद्यार्थिनींनी उत्स्फुर्तपणे सहभागी होत आपले निबंध ऑनलाइन पद्धतीने पाठविले.

दिनांक ८ मार्च २०२१ रोजी महाविद्यालयामध्ये आयोजित कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक रेखा आढाव व प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक डॉ. नीता तिवारी या उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने झाली याप्रसंगी प्राध्यापक रेखा आढाव यांनी या दिनाचे महत्त्व सांगताना म्हटले की स्त्रीजन्म हा खरोखर अतिशय सुंदर आहे. वडिलांना मुलगी, बहिण, आई या रूपात मिळते. वात्सल्य या नात्याने ती घरामध्ये चैतन्य निर्माण करते. निसर्गाने स्त्रीला माता होण्याचा अधिकार दिला. या रूपात ती संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य, आवड निवड, गुण जोपासतांना चांगले व्यक्तिमत्व घडविण्याचा प्रयत्न करते. प्राध्यापक डॉ. नीता तिवारी मॅडम यांनी स्त्री आज प्रत्येक क्षेत्रामध्ये आघाडीवर असून दिवसेंदिवस आपल्या कला गुणांमुळे देशाच्या विकासात महत्त्वाचे योगदान देत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्राध्यापक डॉ. सुरेश पंडित यांनी केले.

या कार्यक्रमाला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते दिनांक ९ मार्च २०२१ रोजी प्राध्यापक डॉ. रजनी देशमुख व प्राध्यापक रत्ना चांडक यांचे ऑनलाईन गेस्ट लेक्चर्स आयोजीत करण्यात आले होते. प्रा.डॉ. रजनी देशमुख यांनी आपल्या भाषणात या दिवसाचा इतिहास, त्यात झालेले बदल, यासाठी केलेला संघर्ष सांगताना स्त्रीला घरापासूनच व्यक्तिमत्त्व साकारण्याकरीता प्रयत्न केले पाहिजेत, आजच्या कोविडच्या संकटामध्ये महिलांनी योद्धा म्हणून भूमिका साकारली आहे, त्यांच्याकरिता हा आंतरराष्ट्रीय महिला दिवस समर्पित केला. त्याकरिता सर्वांनी अभिवादन करावे अशी विनंती केली. प्रा.डॉ. चांडक मॅडम यांनी पुरातन काळापासून सीता, द्रौपदी यांच्या आदर्शाचे ते आतापर्यंतच्या किरण बेदी, कल्पना चावला यांचे उदाहरण देऊन स्त्री जन्म खूप आव्हानात्मक आहे, त्याचे स्वागत करा असे सांगून स्त्रीयांच्या कर्तृत्वावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन डॉ. संगीता लोहकपुरे यांनी केले. कार्यक्रमाला बहुसंख्येने प्राध्यापक, विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.