जागतिक महिला दिनाचे आयोजन
स्थानिक खडकी येथे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळेस प्रथम प्राचार्या डॉ. संगिता लोहकपूरे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून . याप्रसंगी प दिगंबर जैन महाविद्यालयाच्या मराठी विभाग प्रमुख डॉ रंजना भास्कर जोशी यांनी महिला सक्षमीकरण या विषयावर मुलींना मोलाचे मार्गदर्शन केले त्यांनी सुरुवातीच्या काळातील तर आतापर्यंत केलेल्या स्त्रियांच्या विविध भूमिका बद्दल याचे सविस्तर उदाहरण देऊन स्पष्ट केले. त्यांनी प्राचीन काळात स्त्रीला कशी दुय्यम वागणूक देऊन शाळा व इतर कार्यक्रमात भाग घेण्यास बंदी होती. विविध काव्यद्वारे त्यांनी स्पष्ट केले. परंतु आज ही झाशीची राणी अंतराळात सफर करून पायलट बनून संरक्षण सैन्यदलात ट्रेनिंग घेऊन अधिकारी पदापर्यंत पोहोचले आहेत. असे विविध उदाहरण घेऊन मुलींना सशक्तिकरण करण्यावर भर देऊन उंच उंच ध्येय गाठण्याची महत्वकांक्षा ठेवण्यास सांगितले
दुसऱ्या कार्यक्रमात मा जी भौतिक शास्त्र प्रमुख न्यू इंग्लिश हायस्कूल येथील प्रा. वराडे मॅडम यांनी महिलांच्या संरक्षणासाठी मार्गदर्शन केले. प्रा वराडे यांनी मुलींना बाहेर वावरताना उपद्रवी लोकांकडून करण्यात येणाऱ्या छेडखानी पासून संरक्षणाच्या टिप्स सांगितल्या. व काही स्वरक्षणाचे धडे पण दिले यात कराटे व जूदो प्रात्यक्षिक करून दाखविले. तसेच स्वतःजवळ सर्व हेल्पलाइन नंबर ठेवणे, मिरचीची पुर ठेवणे, अनोळखी व्यक्ती पासून काही न खाणे, अनोळखी व्यक्तींना काहीही परिचित माहिती न देणे शक्यतो रात्री एक ते दहा फिरणेकोणी पाटला करत असल्यास मोठ्याने खोटे बोलणे की त्यामुळे पाठलाग करणाऱ्याला भीती वाटून तो पळून जाईल. वरील कार्यक्रम प्राचार्य लोहकपुरे मॅडम यांनी आयोजित .
या कार्यक्रमात प्रा डॉ नीता तिवारी यांनी वृक्षसंवर्धन कार्यक्रम घेऊन विद्यार्थिनींना वृक्षसंवर्धनाची शपथ दिली व समाजातील प्रदूषण नष्ट करण्यासाठी व आपले आरोग्य निरोगी राहण्यासाठी जास्तीत जास्त झाडे लावून वृक्ष संवर्धन करण्याचे आवाहन . याप्रसंगी मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या