जागतिक पुस्तक दिन साजरा
स्थानिक श्री धाबेकर कॉलेज खडकी येथे दिनांक 23 एप्रिल रोजी जागतिक पुस्तक दिन साजरा करण्यात आला. ग्रंथालय विभागातर्फे प्रमुख प्रा. सिद्धार्थ पाटील यांनी या दिनानिमित्त प्रदर्शनीचे आयोजन केले. प्राचार्य डॉक्टर तिवारी यांनी ग्रंथ प्रदर्शनी ची पाहणी केली.व इतर सर्व प्राध्यापकांनी ग्रंथ प्रदर्शनीला भेट दिली.
सर्व विषयांचे आधुनिक अध्यापन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन विविध अशा व्यवसाय विविध क्रीडा कोचिंग गाजलेल्या व साहित्यिकांचे सर्व प्रकारचे साहित्य मानसिक आरोग्य, शारीरिक आरोग्य, चारोळी, लघु कादंबरी अशा सर्व प्रकारच्या पुस्तकांची मेजवानी यानिमित्त विद्यार्थी व प्राध्यापक व इतर कर्मचारी यांना मिळाली.
ग्रंथालय सहाय्यक डॉ. संगीता लोहकपुरे यांनी या प्रदर्शनीचे आयोजन ची जबाबदारी घेतली व ग्रंथालय परिचर शेषराव जाधव यांनी सर्वतोपरी सहाय्य केले