महिलांनी आत्मनिर्भर होणे काळाची गरज आहे!

श्री धाबेकर कला महाविद्यालय खडकी अकोला येथे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानाच्या कार्यक्रम प्रसंगी विचारपीठावर उपस्थित महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर संगीता लोहकपुरे अध्यक्षस्थानी उपस्थित होत्या .प्रमुख मार्गदर्शक म्हणून एडवोकेट लता चोपकर,( वर्धा )ह्या होत्या. ह्या व्याख्यानाच्या प्रमुख आयोजक मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक रेखा अढाव होत्या.

ऑनलाइन व्याख्यानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले यांच्या विचार आणि कार्याचा परिचय व्हावा तसेच आजच्या युवा पिढीला सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांच्या व्यक्तिमत्वातून प्रेरणा मिळावी करिता सदर व्याख्यानाचे आयोजन दरवर्षीप्रमाणे यंदाही करण्यात आले . प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना आणि कार्याला वंदन करून आपले प्रास्ताविक पर मनोगत प्राध्यापक रेखा आढाव यांनी केले. तसेच ह्या व्याख्यानाच्या मार्गदर्शक एडवोकेट लता चोपकर यांचा अल्पसा परिचय प्राध्यापक रेखा आढाव यांनी याप्रसंगी करून दिला .

एडवोकेट लता चोपकर यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना सावित्रीबाई फुले यांच्या आणि विचाराने कार्यावर प्रकाश टाकून, महिलांनी शिक्षणाच्या माध्यमातून आपले सामर्थ्य प्रकट करावे . विद्यार्थिनींनी आणि विद्यार्थ्यांनी कायद्याचा अभ्यास करून भारतीय संविधानाला अनुसरून कायदेविषयक बाबींची माहिती घ्यावी .आज प्रत्येकाला ‘कायदासाक्षर ‘होणे नितांत गरजेचे आहे. प्रत्येकाने कायद्याचे शिक्षण घेऊन वकिली करणे अपेक्षित नाही. दैनंदिन जीवनामध्ये कायद्याच्या आधारे प्रत्येकाचे जगणे अतिशय जबाबदारीचे होऊ शकते. त्यामुळे पुढचे अनेक अनर्थ टळतात,टळू शकतात .

करिता महिलांनी कायद्याचा बारकाईने अभ्यास करून खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर व्हावे ,असा मोलाचा संदेश याप्रसंगी  चोपकर मॅडम यांनी दिला. आपल्या अध्यक्षीय भाषणामधून  प्राचार्य डॉक्टर संगीता लोहाक पुरे यांनी विद्यार्थिनींना ,विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सावित्रीबाई फुले यांचा आदर्श आपल्यासमोर असताना आपण कुठल्याही विपरीत परिस्थितीत न डगमगता जीवनातल्या  प्रत्येक प्रसंगाला धैर्याने सामोरे जाऊन आपला पुरुषार्थ सिद्ध करावा, असा संदेश देत भारतीय संस्कृती मधल्या अनेकविध विदुषींचा उल्लेख करून प्रेरणादायी असे मार्गदर्शन केले.

व्याख्यानाच्या शेवटी मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक रेखा आढाव यांनी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर संगीता लोहकपुरे यांच्यासह एडवोकेट लता चोपकर यांचे तसेच ऑनलाइन व्याख्यानाला उपस्थित महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग विद्यार्थी वर्गाचे आभार  आभार मानले.