लसीकरण शिबीराचे आयोजन
श्री धाबेकर कला महाविद्यालयात 13 जानेवारी रोजी covid-19 लसीकरण शिबिराचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना व श्रीमती शकुंतलाबाई धाबेकर कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आला या कार्यक्रमांमध्ये कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात वयोगट 15 वर्षावरील विद्यार्थ्यांसाठी व सर्व नागरिकांसाठी महाविद्यालयात लसीकरण शिबिर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली
विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातर्फे आरोग्य विभागाचे सर्व कर्मचाऱ्यांचे पुष्प गुच्छ देऊन व शब्द सुमनाने स्वागत केले विद्यार्थ्यांमध्ये असलेली लसीकरण विषयी भीती व भ्रांति दूर करण्यासाठी डॉक्टर प्रज्ञा खांडेराव मॅडम यांनी विद्यार्थ्यांच्या सोबत संवाद साधला व योग्य मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सांगिता लोहकपुरे यांनी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना लसीकरणाचे महत्त्व पटवून दिले व लसीकरणा साठी प्रोत्साहित केले
तसेच प्रा श्रीकांत पाटील सर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ संतोष मिसाऴ यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा डॉक्टर नीता तिवारी यांनी केले या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी व खडकी परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी ही लस घेऊन कार्यक्रमाला उस्फुर्त सहभाग नोंदविला या कार्यक्रमाला वैद्यकीय अधिकारी श्री संजय डाबेराव व डॉक्टर प्रज्ञा ठाकूर मॅडम परिचारिका श्री नाईक मॅडम यांनी लसीकरणाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली सदर लसीकरण शिबिराच्या यशस्वितेसाठी सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी व राष्ट्रीय सेवा योजना सेवकांनी अथक परिश्रम घेतले प्रा स्वाती फाले यांनी ही सर्वांचे आभार व्यक्त केले.