लसीकरण शिबिर
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी कोविड-19 लसीकरण शिबिर
दिनांक 30 ऑक्टोबर 2021 (शनिवार )
महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की लसीकरण शिबिराचे आयोजन शनिवारी सकाळी ०८:०० ते दुपारी ०१:००वाजेपर्यंत या वेळेत करण्यात आलेले आहे
ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप कोणतीही लस घेतलेली नाही अशा 18 वर्षे वय पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी लस घेण्यासाठी महाविद्यालयात येऊन लस घ्यावी तसेच ज्या विद्यार्थ्यांनी एक लस घेतली असेल व दुसऱ्या लसीसाठी तारीख आली असेल त्यांनी ही लस घेण्यासाठी महाविद्यालयात उपस्थित राहावे
येताना सोबत आधार कार्ड आणि आधार कार्ड ला जोडलेला मोबाईल सोबत आणावे
येताना पोटभर जेवण करून यावे तोंडाला बांधण्यासाठी मास्क सोबत आणावा ज्यांनी गुगल फॉर्म भरला नाही त्यांनी भरून ध्यावे ,
सर्व तासिका ऑफ लाईन सुरू करण्यासाठी तसेच पुढे परीक्षा फॉर्म वगैरे बाबींचा पूर्ततेसाठी विद्यार्थ्यांनी लस घेणे आवश्यक आहेत या साठी सर्वांनी महाविद्यालयात आयोजित केलेल्या या शिबिरांचा लाभ घ्यावा.