शिक्षक दिन साजरा
शारीरिक शिक्षण विभागातर्फे डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस संपूर्ण भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये शिक्षकांचे योगदान अमूल्य असते. त्यामुळे शिक्षकांचे विचार ध्येय समोर ठेवून सर्व विद्यार्थ्यां वर शिक्षण संस्कार देऊन घडवू असे मत प्राचार्य,डॉ. संगीता लोहकपुरे यांनी केले.
डॉ. नीता तिवारी यांनी प्रास्ताविक केले.शिक्षण क्षेत्रामध्ये अमुल्य कामगिरी करण्याची संधी प्रत्येकाला मिळत आहे दिवसेंदिवस गुणवत्तेचा स्तर कामगिरी त्याद्वारे शिक्षकांचा दर्जा वाढत आहे महाविद्यालयाचा सर्वांगीण विकासात शिक्षकांची योगदान भरीव असते विद्यार्थी केंद्रित ठेवून त्यांच्या सर्वांनी विकासाचा ध्यास प्रत्येक शिक्षकांनी मनी ठेवून राष्ट्राच्या प्रगतीमध्ये विद्यार्थी घडविण्यात योगदान द्यावे असे मत शारीरिक शिक्षक विभाग प्रमुख प्रभारी प्राचार्य डॉ. संगीता लोहकपूरे यांनी व्यक्त केले.महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या प्रसंगी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी याप्रसंगी ऑनलाइन सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या व आपले मनोगत व्यक्त केले.