रासेयोच्या वतीने स्वामी विवेकानंद जयंती व जिजाऊ जयंती साजरी

स्थानिक -अकोला श्री धाबेकर कला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना यांच्या वतीने राष्ट्रीय युवा दिन निमित्त स्वामी विवेकानंद जयंती व जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संगीता लोहकपुरे उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा श्रीकांत पाटील सर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात स्वामी विवेकानंद व जिजाऊ माता यांच्या प्रतिमा पूजनाने व दिप प्रज्वलित करून करण्यात आली त्यावेळी स्वामी विवेकानंद यांच्या जीवन चरित्रावर आधारित प्राध्यापक श्रीकांत पाटील यांनी आपले विचार व्यक्त केले, अध्यक्षीय भाषण डॉक्टर संगीता लोहकपुरे यांनी दिले कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉक्टर नीता तिवारी यांनी केले तर आभार प्रदर्शन कुमारी अर्पिता चांदूरकर यांनी व्यक्त केले या वेळेवर महाविद्यालयाचे विद्यार्थी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.