सूर्यनमस्कार कार्यशाळेचे आयोजन
स्थानिक खडकी श्री धाबेकर कला महाविद्यालय शारीरिक शिक्षण विभागा अंतर्गत दिनांक 28 जानेवारी 2023 रोजी रथसप्तमी निमित्त सूर्यनमस्कार वर्कशॉप चे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी महाविद्यालयातील शारी. शि. संचालक डॉ संगीता लोहकपुरे यांनी विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कार व प्राणायामचे प्रात्यक्षिक दाखविले सूर्याच्या 12 नावाने सूर्यनमस्कार व प्राणायाम विद्यार्थ्यांकडून करून घेतले.
सर्वप्रथम डॉ संगीता लोहकपुरे मॅडम यांनी रथसप्तमी व सूर्य यांचे या दिवशीचे महत्त्व थोडक्यात सांगून हिंदू संस्कृतीमध्ये या दिवसाचे वैशिष्ट्य कथन केले. रथसप्तमीचे औचित्य साधून महाविद्यालयातील सुमारे 60 विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला प्रत्येक सूर्यनमस्काराच्या दहा स्टेप करून त्यामध्ये अंतर्भूत असलेल्या विविध आसनांची व त्याचे फायदे याची माहिती थोडक्यात सांगितली प्रथम वार्मअप करून प्रत्येक स्टेप समजावून सांगितल्या नंतर पाच प्राणायामाचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांकडून करून घेतले. यात प्रथम भास्त्रिका, कपालभाती ,अनुलोम विलोम , भ्रामरी व ओमकार हे प्राणायाम करून घेतले. याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्य. डॉ.तिवारी यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.