सूर्यनमस्कार कार्यशाळा संपन्न

रथसप्तमी निमित्त सूर्यनमस्कार कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. प्रचार्या व शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. लोहकपुरे यांनी सर्व विद्यार्थ्यांना सूर्यनमस्काराचे प्रशिक्षण दिले.      

जागतिक सूर्यनमस्कार दिन म्हणून रथसप्तमीला महत्त्व दिले जाते परंतु यावर्षी गान साम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनामुळे 07 फेब्रुवारीला राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला. त्यामुळे या कार्यशाळेचे आयोजन दिनांक 10/02/22ला करण्यात आले.

डॉ. लोहकपुरे यांनी सर्वप्रथमसूर्यनमस्कार हा सर्व योगा आसनांचा राजा आहे. हे सांगताना यानमस्कारामध्ये कोणत्या आसनांचा अंतर्भाव होतो हे प्रात्यक्षिक द्वारे करून दाखविले व सर्व विद्यार्थ्यांकडून करून घेतले प्रत्येकी बारा सूर्यनमस्कार सूर्याचे बारा नावाने केले या अगोदर वॉर्म अप शरीर अनुकूल क्रिया करविली प्रत्येक स्टेपनी होणारे फायदे सांगतांना योग्य स्थितीचे महत्त्वही सांगितले.

नमस्कार करतांना प्रत्येक स्थितीत अर्धा मिनिट थांबण्याची सूचना दिली हळुवारपणे प्रत्येक क्रिया करावी असे सूचित केले. त्यानंतर शिथिल करत करून नंतर पाच प्राणायाम सगळ्यांकडून करून घेतले यामध्ये प्रथम भ्रस्त्रीका भ्रामरी अनुलोम विलोम कपालभारती व ओमकार हे पाच प्राणायाम शिकविले या कार्यशाळेत 60 विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते दीड दीड तासाचे प्रत्येक बॅच ला प्रशिक्षण देण्यात आले प्रशिक्षणार्थींना नंतर डॉ लोहकपुरेयांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.