अभ्यास दौऱ्याचे आयोजन
महाविद्यालयाच्या वतीने दिनांक 10 फेब्रुवारी 2024 रोजी अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले. हा अभ्यास दौरा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व विविध विभाग प्रमुखाच्या उपस्थितीत संपन्न झाला. हा अभ्यास दौरा इतिहास विभाग, पर्यावरण शास्त्र विभाग व इंग्रजी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने बाळापुर चा किल्ला, जाळीचा देव, अजिंठा लेण्या, शेगाव संस्थान इत्यादी ठिकाणी आयोजित करण्यात आला. यामध्ये इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. सुरेश पंडित,पर्यावरण शास्त्र विभाग प्रमुख डॉ.संगिता लोहकपुरे व इंग्रजी विभाग प्रमुख प्रा.राहुल घुगे यांच्यासह महाविद्यालयात प्रवेशित एकूण 31 विद्यार्थी हे सहभागी झाले होते.
अभ्यास दौराचा सकाळी 7 वाजता प्रारंभ करण्यात आला. सर्वप्रथम ऐतिहासिक बाळापूरच्या किल्ल्याला भेट देण्यात आली. सूक्ष्म निरीक्षणाअंती वास्तूचा अभ्यास करण्यात आला. काही तासाचा प्रवास केल्यानंतर या दौऱ्यात सहभागी झालेले सर्वजण अजिंठा लेणी या ठिकाणी पोहोचले. तिथे असलेल्या एकूण 26 लेण्यांना भेट देण्यात आली. वाकाटक व सातवाहन कालीन निर्मित असलेल्या या लेण्यावरील शिल्पकला, चित्रकला, नक्षीकाम, कोरीवकाम पाहून दौऱ्यातील सहभागी झालेले विद्यार्थी मंत्रमुक्त झाले व या बांधकामाचे त्यांनी कुतूहल व्यक्त केले. पुढील प्रवास करून हा अभ्यास दौरा जाळीचा देव या ठिकाणी पोहचला. दर्शनानंतर तेथील भक्ती भाव, श्रद्धा व निसर्गरम्य वातावरणाचा मनमुराद आनंद लुटून अभ्यागतांनी समाधान व्यक्त केले. नंतर शेगाव संस्थान ला भेट देऊन श्री दर्शनाने अभ्यास दौऱ्याची सांगता करण्यात आली.
या अभ्यास दौऱ्यात ऐतिहासिक वारसा, जागतिक पर्यटन स्थळ, वास्तूकलेचा सर्वोत्कृष्ट नमुना , निसर्गरम्य स्थळ, बघायला मिळाले हा मनोदय दौऱ्यात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. तसेच हा ऐतीहासिक वारशाचे जतन व संवर्धन व्हावे ही काळाची गरज आहे असे मत नोंदविले. महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ. संजय देशमुख , डॉ . सुरेश पंडित डॉ. संगिता लोहकपूरे प्रा. राहुल घुगे यांच्यामुळेच आम्हाला हे नयनरम्य, जागतिक आश्चर्य असलेली स्थळे बघायला मिळालीत असे मत व्यक्त केले. या दौऱ्यात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी संपूर्ण दौऱ्यात जी शिस्त राखली, त्याबद्दल समाधान व्यक्त करून दौऱ्याची सांगता करण्यात आली.