संविधान दिन साजरा

श्री धाबेकर कला महाविद्यालयात संविधान दिन साजरा खडकी अकोला : स्थानिक श्री धाबेकर कला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना च्या वतीने प्राचार्य डॉ. संगीता लोहकपुरे, रा.से. यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. राहुल घुगे व समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा. अमरिश गावंडे यांच्या उपस्थितीत संविधान दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजनाने व दीप प्रज्वलनाने करण्यात आली. याप्रसंगी रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. राहुल घुगे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना भारतीय संविधान निर्मिती व त्याचा अंगीकार तसेच भारतीयांच्या जीवनातील संविधानाचे महत्त्व विशद केले.

भारतीय संविधान प्रत्येकाच्या मनात रुजविले पाहिजे व संविधानाची तत्वप्रणाली तळागाळातील प्रत्येकापर्यंत पोहोचविली पाहिजे तसेच आपण जे आज मुक्तपणे जीवन जगतोय ते संविधानाची देणगी आहे असे मत मांडले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.संगीता लोहकपुरे यांनी देशाची एकता व अखंडता अबाधित राखण्यात भारतीय संविधानाचे मोलाचे योगदान असल्याचे मत मांडले.

याप्रसंगी समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा. अमरीश गावंडे यांनी संविधान निर्मात्यांनी समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय यावर आधारित भारतीय समाजाचे जे स्वप्न पाहिले ते साकार झाले असल्याचे मत मांडले. याप्रसंगी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत संविधान उद्देश पत्रिकेचे वाचन देखील करण्यात आले कार्यक्रमास महाविद्यालयीन प्राध्यापक वर्ग ,शिक्षकेतर कर्मचारी वर्ग व राष्ट्रीय सेवा योजना चे स्वयंसेवक उपस्थित होते.