संत गाडगेबाबा जयंती साजरी
श्री धाबेकर कला महाविद्यालयाच्या वतीने बुधवार दिनांक 23 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय सेवा योजना व अर्थशास्त्र विभाग यांच्यात संयुक्त विद्यमानाने राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमा पूजनाने व दीपप्रज्वलन करून करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ संतोष मिसाळ सर होते तर प्रमुख अतिथी प्रा. राहुल घुगे हे होते, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा, डॉ. नीता तिवारी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले आणि संत गाडगेबाबांच्या जीवनाच्या निमित्ताने गाडगेबाबांनी जी दशसूत्री सांगितलेले होते तिचे वाचन करण्यात आले स्वतःला लोक कल्याणासाठी अर्पण केले होते रूढी-परंपरा ,प्रथा, अंधविश्वास चमत्कार या विचारांच्या गाडगेबाबांनी सतत विरोध केला होता, प्रमुख मार्गदर्शक प्रा. राहुल घुगे यांनी सांगितले की संपूर्ण भारताला स्वच्छतेची शिकवण देणारे, अमरावती विद्यापीठाला त्यांचे नाव देण्यात आले असे संत गाडगे महाराज विज्ञान आणि आर्थिक दृष्टिकोन असलेले सुप्रसिद्ध एक समाज सुधारक होते आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. संतोष मिसाळ यांनी ही संत गाडगेबाबा यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला या दिवशी दोन्ही विभागाकडून गरिबांना अन्न व फळ वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. कल्याणी लुले यांनी केले तर आभार प्रदर्शन अमोल पाखरे यांनी केले यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.