रस्ता सुरक्षा नियमांचे मार्गदर्शन पथनाट्य व रॅलीद्वारे जनजागृती

श्री धाबेकर कला महाविद्यालयात रस्ता सुरक्षा नियमांचे मार्गदर्शन पथनाट्य व रॅलीद्वारे जनजागृती स्थानिक श्री धाबेकर कला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना च्या वतीने प्राचार्य डॉ. संगीता लोहकपुरे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. राहुल घुगे यांच्या मार्गदर्शनात रस्ता सुरक्षा नियमांचे मार्गदर्शन करण्यात आले. या प्रसंगी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री विनोद जिजकार प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने तसेच संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. राहुल घुगे यांनी केले याप्रसंगी त्यांनी रस्ता सुरक्षा नियमांचे पालन करणे कसे आवश्यक आहे व त्यातून आपण आपले तसेच इतरांचे जीवन कसे सुरक्षित करू शकतो
या संदर्भात यात माहिती दिली. प्रमुख मार्गदर्शक श्री विनोद जिचकार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वेगावर नियंत्रण ठेवणे तसेच सावधगिरी बाळगून वाहन चालविणे आणि वाहन चालविताना वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे असे मत मांडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संगीता लोहकपुरे यांनी देखील याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व या माध्यमातून समाजात जनजागृती करण्याचे आव्हान देखील विद्यार्थ्यांना केले. महाविद्यालयामार्फत रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत रस्त्याच्या दुतर्फा बाजूने विद्यार्थ्यांनी उभे राहून ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना वाहतुकीच्या नियमांचे पत्रकांचे वाटप केले. या प्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पथनाट्य देखील सादर करून जनजागृती केली. कार्यक्रमास परिवहन विभागातील श्री मेश्राम साहेब महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग तसेच शिक्षकेतर कर्मचारी व रासेयोचे स्वयंसेवक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्याणी लुले यांनी केले तर आभार प्रदर्शन कुमारी पायल चव्हाण हिने केले.