वाचन प्रेरणा दिन कार्यक्रम संपन्न
स्थानिक खडकी श्री धाबेकर कला महाविद्यालयात खडकी येथे प्राचार्या डॉ संगीता लोहकपुरे यांच्या मार्गदर्शनात ग्रंथालय विभागाच्या वतीने प्रेरणा दिन कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ संगीता लोहकपुरे या होत्या त्यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांनी वाचनाची गोडी वाढवावी असे सांगून व ग्रंथ ज्ञानदानाचे कार्य करतात ग्रंथ हेच आपले गुरू आहेत जीवन समृद्ध करायचे असेल तर विद्यार्थ्यांनी दिवसेंदिवस वाचनाच्या कक्षा रुंद वायला पाहिजेत परंतु विद्यार्थी आज इंटरनेट कडे वळले आहे त्यामुळे त्यांची द्विधा अवस्था झाली आहे तरी त्यांनी वाचनाकडे वळून ज्ञान समृद्ध केले पाहिजे चांगली पुस्तके वाचली पाहिजेअसे आवाहन केले.
ग्रंथपाल प्रा सिद्धार्थ पाटील यांनी विद्यार्थ्यांना याबाबत प्रेरणा दिनाचे महत्त्व समजावून सांगितले डॉ . मिसाळ सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आभार मानले कार्यक्रमाला विद्यार्थी व सर्व महाविद्यालयातील कर्मचारी उपस्थित होते हा कार्यक्रम 15 ऑक्टोंबर 2021 ला संपन्न झाला