प्रा. अमरीश गावंडे यांना आचार्य पदवी
श्री धाबेकर कला महाविद्यालयातील प्राध्यापक अमरीश गावंडे यांना आचार्य पदवी
खडकी अकोला : स्थानिक श्री धाबेकर कला महाविद्यालयातील समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा. अमरीश गावंडे यांनी आचार्य पदवी प्राप्त केली 2009 पासून श्री. धाबेकर कला महाविद्यालयात समाजशास्त्र विभाग म्हणून कार्यरत असलेले प्रा. अमरीश गावंडे यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर येथून संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाचा आरोग्य दर्जा वरील प्रभाव – एक समाजशास्त्रीय अध्ययन (विशेष संदर्भ अमरावती महसूल विभाग) या विषयावर संशोधन कार्य पूर्ण करून शोधप्रबंध सादर केला त्यांच्या संशोधन कार्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर यांनी मान्यता प्रदान करून त्यांना आचार्य पदवी प्रदान केली. ग्रामीण विकासाच्या अनुषंगाने आणि ग्रामीण भागातील समस्या कमी करण्यासाठी प्रस्तुत संशोधनाची शासनास व अभ्यासकांना मोठ्या प्रमाणात मदत होऊ शकते.
प्राध्यापक अमरीश गावंडे यांनी आपल्या यशाचे श्रेय सन्माननीय अनिलभाऊ धाबेकर, त्यांचे मार्गदर्शक डॉ.संजय गुडधे समाजशास्त्र विषयाचे प्रा. डॉ. दिनकर उंबरकर डॉ. सुनील गायगोळ, डॉ.अनिल ठाकरे महाविद्यालयाचे प्राचार्य,प्राध्यापक सहकारी, शिक्षकेतर कर्मचारी आणि कुटुंबातील सदस्य व मित्र परिवारास दिले
प्राध्यापक अमरीश गावंडे यांनी आपले संशोधन कार्य वडील श्री श्रीकृष्ण गावंडे यांच्या चरणी अर्पण केले.