वार्षिकांक पसायदानाचे विमोचन

स्थानिक- श्री धाबेकर कला महाविद्यालयातील वार्षिकांक पसायदान 2019-20चे विमोचन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संगीता लोहकपुरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. या कार्यक्रमात IQAC न‌‌ॅक समन्वयक प्रा राहुल घुगे, श्रीमती शकुंतलाबाई धाबेकर कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा स्वाती फाले मॅडम व संपादक अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा डॉ निता तिवारी प्रमुख्याने व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगेबाबांचा पूजनाने करण्यात आली नंतर उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले आणि मान्यवरांच्या हस्ते वार्षिकांक पसायदानचे विमोचन करण्यात आले. अध्यक्षीय विचार व्यक्त करतांना महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ संगीता लोहकपुरे यांनी पसायदान या वार्षिक अंकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या प्रगतीकरिता राबवलेल्या कार्यक्रमाचे उल्लेख केले. प्रा डॉ नीता तिवारी यांनी आपल्या प्रास्ताविकेत सांगितले की मी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांच्या सहकाऱ्यांनी संपादकिय कार्य पूर्ण केले आणि सर्वांचे आभार मानले.