वार्षिक अंक पसायदान चे विमोचन
खडकी – अकोला स्थानिक श्री धाबेकर कला महाविद्यालयात पसायदान या वार्षिक अंकाचे विमोचन डॉ संगीता लोहकपुरे यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगेबाबा यांचे पूजनाने व दीप प्रज्वलन करून करण्यात आली.या कार्यक्रमात अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संगीता लोहकपुरे या उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक डॉ नीता तिवारी यांनी केला.त्यांनी आपले मनोगत सांगितले की पसायदान या वार्षिक अंकाचे संपादन करताना मला अत्यंत आनंद वाटला आणि शब्द हेच जीवन आहे.आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ संगीता लोहकपुरे यांनी सांगितले की श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी विश्वाच्या कल्याणासाठी मागितलेले पसायदान विद्यार्थ्यांच्या उन्नती व हिताचा उद्देश समोर ठेवून ही संस्था कार्य करीत आहे.आमच्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री अनिल भाऊ धाबेकर व सचिव आदरणीय श्री सिद्धार्थ भाऊ धाबेकर यांच्या मार्गदर्शनाने व प्रत्यक्ष सहभागाने महाविद्यालयाने विविध स्तरांवर उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे .विद्यार्थ्यांच्या भावनिक बौद्धिक सामाजिक व मानसिक विकास व्हावा या दृष्टीने आम्ही अभ्यासाबरोबर विविध कार्यक्रमाचे आयोजन वर्षभर करीत असतो.सर्व विद्यार्थ्यांच्या उपक्रमांची माहिती संग्रहित राहावी या उद्देशाने पसायदान प्रकाशित होत आहे.प्रा डॉ निता तिवारी यांनी आभार व्यक्त करताना सांगितले की या कार्यक्रमात महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले.या सर्वांविषयी मी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करते.