पदवीदान समारंभ

श्री धाबेकर कला महाविद्यालयात पदवीदान समारंभाचे आयोजन खडकी अकोला स्थानिक श्री धाबेकर कला महाविद्यालयामध्ये दिनांक 6 जुलै 2021 रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संगीता लोहकपुरे मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली व प्राध्यापक बळीराम अवचार यांच्या प्रमुख उपस्थितीत पदवीदान समारंभ चे आयोजन करण्यात आले याप्रसंगी प्राध्यापक अमरीश गावंडे व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थित होते संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती यांच्या वतीने पदवी शिक्षण पूर्ण करणाऱ्या यशस्वी विद्यार्थ्यांना विद्यार्थी विद्यापीठाकडून पदवी प्रदान करण्यात येत असते मागील काही वर्षापासून हा सोहळा महाविद्यालय स्तरावर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे

मागील वर्षी यश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना यावर्षी महाविद्यालयांमध्ये पदवी प्रदान करण्यात आली आपल्या विविध कलागुणांना विकसित करून तीन वर्षे पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्याबद्दल मान्यवरांनी उपस्थित विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली पाहुण्यांच्या स्वागता नंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय प्राध्यापक अमरिश गावंडे यांनी करून दिला महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पदवी प्राप्त करून यश प्राप्त करणे ही प्रत्येक विद्यार्थ्यांची इच्छा असते आणि आपल्या शैक्षणिक गुणवत्तेच्या आधारावर आयुष्यात काही तरी बघण्याचा जो आधार आहे तो पदवी शिक्षणातून प्राप्त होत असतो महाविद्यालय स्तरावर प्राप्त होणारे व्यासपीठ स्पर्धेमध्ये शिकण्याची जिद्द ही महाविद्यालय स्तरावर ग विद्यार्थ्यांमध्ये येत असते म्हणून पदवी ही व्यक्तीच्या जीवनातील अतिशय महत्त्वाचा टप्पा असल्याचं दिसून येते कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक मार्गदर्शक प्राध्यापक बळीराम भावसार यांनी आपले विचार व्यक्त करताना शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे ते पिल्यावर व्यक्ती गुरगुरल्याशिवाय राहत नाही या व्यक्तीला सार्थ करणाऱ्या शिक्षण म्हणजे पदवी शिक्षण होईल ग्रामीण भागातील विद्यार्थी जेव्हा महाविद्यालय स्तरावर शिक्षण घेतो तेव्हा त्याला अनेक अडचणी येत असतात

परंतु ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये असणारी चिकाटी श्रम करण्याची तयारी आणि परिस्थिती स्वतःला सिद्ध करण्याची त्याची जिद्द त्याच्या यशाची खरी गुरुकिल्ली असते म्हणून आतापर्यंत आपण यशस्वी झालेले आहात आणि या ही पुढे याचा आपल्या गुणांच्या सोबत आपण उत्तरोत्तर यशस्वी होत राहा अशा शुभेच्छा विद्यार्थ्यांना दिल्या व यशस्वितेकरिता सर्व परीने प्रयत्न करण्याचे आव्हान देखील आपले अध्यक्ष विचार व्यक्त करताना महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ लोहकपुरे मॅडम यांनी विद्यार्थी दशा ही भावी आयुष्याला दिशा प्राप्त करणारी अवस्था असते आणि याद असे मध्ये जे विद्यार्थी प्रामाणिक प्रयत्न करतात त्यांना उज्वल भविष्य आणि समृद्ध जीवन प्राप्त होते म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपले अथक परिश्रम प्रामाणिक अभ्यास आणि स्वतः मध्ये असणारी जिद्द व चिकाटी कायम ठेवून यशस्वी वाटचाल करावी व पदव्युत्तर शिक्षण घेत असताना पदवी शिक्षण घेतलेल्या महाविद्यालयांमध्ये जे प्राप्त झाले त्याला विसरू नये असे विचार व्यक्त केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा राहुल घुगे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी कल्याणी लुले यांनी केले कार्यक्रमाकरिता पदवी प्राप्त विद्यार्थी व महाविद्यालयातील काही निवडक विद्यार्थी उपस्थित होती