एक दिवसीय वेबिनार
श्री धाबेकर कला महाविद्यालयात वेबिनार संपन्न. स्थानिक खडकी श्री धाबेकर कला महाविद्यालय येथे दिनांक 27 जुलै रोजी एक दिवसीय वेबिनार तथा तक्षशील आयुर्वेदा यांच्या संयुक्त विद्यमाने त्वचेचे आजार व आयुर्वेद या विषयावर प्राचार्य डॉ. लोहकपुरे मॅडम यांनी शारीरिक शिक्षण विभागातर्फे या वेबिनारचे आयोजन केले होते. यावेळी डॉ. रूपाली सावळे यांनी प्रथम त्वचा, रक्त त्याचे कार्य, पचनसंस्था विकार, मुरूम होण्याची कारणे रक्त अशुद्ध होण्याचे कारण, सात्विक आहाराचे म महत्व, अपचन, अनिद्रा त्याचे आरोग्यावर दुष्परिणाम याद्वारे त्वचेचे आजार कसे बनवतात याची संक्षिप्त माहिती दिली. या सर्वावर आयुर्वेदाच्या साहाय्याने उपायांची माहिती दिली. आज मुलांमध्ये प्रचंड प्रिय असलेले फास्ट फूड, फॅटी पदार्थ, मसालेदार पदार्थ चुकीची जीवनशैली, व्यायामाचा अभाव, जागरण त्या सर्वापासून दूर राहून त्वचेचे रोग टाळू शकतो. असे सांगितले डॉ. रूपाली सावळे योगाचार्य असून आयुर्वेद व पंचकर्म तज्ञ सुद्धा आहे. या वेबिनार ला प्रचंड प्रतिसाद मिळाला. काश्मीर येथील प्रा. नसरीन सुद्धा हजर होत्या. त्यांनी डॉ. सावळे यांना समस्या विचारल्या तसेच विद्यार्थिनी,प्राध्यापक, प्राचार्य विविध मान्यवरांनी आपल्या शंका विचारल्या. त्याचे निरसन डॉ. रूपाली सावळे यांनी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून केले. सर्वांनी डॉ. लोहकपुरे,डॉ. सावळे यांचे या वेबिनार च्या आयोजनाबद्दल आभार मानले.