राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन साजरा

राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन साजरा. खडकी : स्थानीक श्री धाबेकर कला महाविद्यालयात 24 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. संतोष मिसाळ हे होते या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. अशोक वाहुरवाघ हे लाभले होते.

त्याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना महिला कार्यक्रम अधिकारी व पुरुष कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ.सुरेश पंडित हे सुद्धा उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमा पूजनाने तसेच राष्ट्रीय सेवा योजना गीताने करण्यात आली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुरुष कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. सुरेश पंडित यांनी करताना राष्ट्रीय सेवा योजना काय आहे, आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या दिनविशेषाचा इतिहास समजावून सांगितला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून लाभलेले प्रा डॉ अशोक वाहुरवाघ यांनी आपल्या विचारातून देशाच्या उज्वल भविष्यासाठी विद्यार्थी घडविणे आवश्यक असून त्याला घडविण्याचे राष्ट्रीय सेवा योजना हे उत्तम माध्यम असल्याचं मत अनेक उदाहरणे देऊन पटवून दिलं.

महिला कार्यक्रम अधिकारी प्रा.नीता तिवारी यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले प्रा डॉ संतोष मिसाळ यांनी सुद्धा आपल्या अध्यक्षीय विचारातून समाधान समाजोन्नती, व राष्ट्रउन्नतीत आज राष्ट्रीय सेवा योजनेचा महत्वाचा वाटा असल्याचे मत सोदाहरण पटवून दिलं या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. गायत्री तायडे व आभार प्रदर्शन कु. पौर्णिमा जाधव यांनी केले त कार्यक्रमाचे यशस्वीतेकरिता महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी मोलाचे सहकार्य केले या कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजननेच्या स्वयंसेवकाची उपस्थिती लक्षणीय होती. याप्रसंगी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे जे ज ध्येय आणि उद्दिष्ट आहेत त्याची आम्ही प्रामाणिकपणे अंमलबजावणी करणार अशा प्रकारचा संकल्प सुद्धा याप्रसंगी केला. सर्वांचे आभार मानून त्या कार्यक्रमाची समाप्ती करण्यात आली.