राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस
श्री धाबेकर कला महाविद्यालय खडकी अकोला येथील राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस निमित्त कर्मयोगी गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पमाला अर्पण करण्यात आली. राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन हा विद्यार्थ्यांच्या आणि महाविद्यालयाच्या राष्ट्रीय स्वयंसेवकांकरिता आवडीचा आणि खास दिवस असतो. मात्र सद्यस्थितीत करोना काळाचा प्रकोप अद्यापही ओसरला नसल्यामुळेआणि महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे नियमित येणे अद्याप सुरू झाले नसल्यामुळे ऑनलाइन पद्धतीने मार्गदर्शन पर कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे ठरले आहे .आजच्या या राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिनाच्या कार्यक्रम प्रसंगी अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या सन्माननीय प्राचार्य डॉक्टर संगीता लोहकपुरे ह्या होत्या. तसेच माजी कार्यक्रम अधिकारी प्रा.राहुल घुगे यांच्यासह वर्तमान राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. रेखा अढाव यांच्या उपस्थितीत कर्मयोगी गाडगेबाबांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून गाडगेबाबांच्या कार्याला आणि विचारांना वंदन करण्यात आले .तसेच राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिनानिमित्त महाविद्यालयाच्या प्राचार्य सन्माननीय डॉक्टर संगीता लोहकपुरे यांनी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देऊन आपले मनोगत व्यक्त केले. रासेयो कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक रेखा आढाव यांनी सन्माननीय प्राचार्य डॉक्टर लोहकपुरे यांचे तसेच प्राध्यापक वर्ग आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे आभार मानून सदर कार्यक्रमाची सांगता झाली.