National webinar on polumanary rehabilitation
श्री धाबेकर कला महाविद्यालयात राष्ट्रीय वेबिनार चे आयोजन, खडकी स्थानिक श्री धाबेकर कला महाविद्यालय, खडकी येथे एक दिवसीय राष्ट्रीय वेबिनार (पूल मनोरी रेहाबिलिटेशन covid-19) या विषयावर शारीरिक शिक्षण विभागातर्फे आयोजित केले होते. या वेबिनार च्या वक्त्या डॉ. समृद्धी नाईकवाड ह्या होत्या. त्यांनी विविध प्रकारच्या व्यायामाद्वारे स्वसन व फफुसाचे तंत्र, covid-19 च्या प्रतिकारासाठी कार्य, ऑक्सीजन क्षमता वाढवणे व लहान उपकरणाद्वारे त्याचे महत्त्व प्रात्यक्षिकाद्वारे दाखविले. प्रत्येक व्यायाम उपस्थितांकडून करून घेतला तसेच तांत्रिक कौशल्य द्वारे समजून सांगितले. ताण तनाव घालविणे, शरीराची रक्ताभिसरण संस्था कार्यान्वित करणे योग्य श्वासोश्वास कशा प्रकारे करावा त्याचे महत्त्व व कारण विविध स्लाईड शो द्वारे व स्वतःच्या प्रात्यक्षिकाद्वारे समजून सांगितले घरच्या घरी हे व्यायाम करून संपूर्ण कुटुंबाची ऑक्सीजन लेवल वाढवून अधिक क्रियाशील बनविण्याचे आवाहन केले. तसेच उपस्थितांच्या शंकाचे निरसनही केले.
या वेबीनार चे आयोजक डॉ. संगीता लोहकपूरे यांनी नुकत्याच संपलेल्या covid-19 लाटेची भीषणता सांगताना म्हटले की, या लाटेने सर्वात जास्त नुकसान तरुण पिढीचे झाले आई वडिलांसमोर कित्येक 25 ते 40 वयोगटातील तरुण यासाठी बळी पडले ऑक्सीजन नाही, सिलेंडर नाही, रुग्णालयात बेड नाही पुरेसे मनुष्यबळ नाही. रोजचे संपूर्ण भारतात पाच ते दहा हजार लोक मृत्युमुखी पडत होते. दवाखान्यात गेलेला परत येतो की नाही एवढी धास्ती होती. या संकटाचा सामना करण्यासाठी सर्वात प्रथम प्रत्येकाने आपल्या शरीराची कार्यक्षमता वाढविणे किती जरूरी आहे हे स्पष्ट केले. या वेबिनार ला संपूर्ण महाराष्ट्रातून प्रतिसाद मिळाला. आहे आय क्यू ए सी समन्वयक प्रा. राहुल घुगे व आभार प्रदर्शन प्रा. अमरीश गावंडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले सर्वांनी डॉ. लोहकपुरे, डॉ. नाईकवाड यांचे वेबिनार आयोजनाबद्दल आभार मानले.