राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा
स्थानिक खडकी ,चांदुर येथे श्री धाबेकर कला महाविद्याल येथे मेजर ध्यानचंद हॉकीचे जादूगर यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 29 ऑगस्ट व 30 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला.
श्रीमती अन्नपूर्णाबाई गुलवाडे जुनियर कॉलेजचे प्राध्यापक श्री ऋषिकेश चोपडे हे याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून हजर होते . शारीरिक शिक्षण संचालक डॉ . संगीता लोहकपुरे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते . कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री संत गाडगेबाबा महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण प्राध्यापक ऋषिकेश चोपडे यांनी केले . महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संतोष मिसाळ यांनी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण केले डॉ लोहकपुरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यांनी क्रीडा हा जीवनाचा अविभाज्य घटक असून कोरोना काळात याचे महत्त्व संपूर्ण जगाला पटल्याचे सांगितले तसेच मेजर ध्यानचंद यांचे संपूर्ण जीवनपट थोडक्यात सांगितले . महाविद्यालयातर्फे आयोजित विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांना भाग घेण्यासाठी प्रोत्साहित केले . प्रा चोपडे हे महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व हॉलीबॉल चे उत्कृष्ट खेळाडू होते .असे सांगून जुन्या आठवणी सांगितल्या
प्रा चोपडे यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना अतिशय भावनिक घटना सांगून महाविद्यालया तर्फे आपली आस्था दाखवून विद्यार्थ्यांना अभ्यास , यश, परिश्रम , ध्येय , चिकाटी , खिलाडी वृत्ती याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करताना अनुभवातून सांगितले .विद्यार्थी सुद्धा अतिशय भाऊक झाले होते.
डॉ .मिसाळ सर यांनी खेळ व क्रीडा व्यक्तिमत्व घडविण्यास कसे सहाय्य करतात हे विस्तृतपणे सांगितले खेळाडू हा अभ्यासात कशी प्रगती करतो सर्वगुण संपन्न व्यक्तिमत्त्वाचे ते धनी असतात असे सांगून विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धेमध्ये भाग घेण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी कॅरम , बुद्धिबळ , टॅग ऑफ़ वॉर ,संगीत खुर्ची , या स्पर्धा झाल्या तसेच दिनांक 30 ऑगस्टला दुपारी क्रिकेट व व्हॉलीबॉल या स्पर्धा झाल्या सर्व विद्यार्थ्यांनी स्पर्धांमध्ये भाग घेऊन क्रीडा दिन यशस्वी केला .
कार्यक्रमाचे संचालन नंदिनी इंगळे व आभार प्रदर्शन रोहन पातोंड यांनी केले .