राष्ट्रीय परिषदेचे थाटात उदघाटन
“शिक्षकांनी तंत्रज्ञानाच्या काळात स्वतःला अपडेट करावे” – कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते
स्थानिक श्री धाबेकर महाविद्यालय, खडकी अकोला व तक्षशिला महाविद्यालय अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने 22 डिसेंबर 2025 रोजी तक्षशिला महाविद्यालय अमरावती येथे ‘Exploring the role of AI, NEP, Innovation and Incubation through multidisciplinary perspectives in transforming the futurescope of India ‘ या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिषद (National Conference) आयोजित करण्यात आली होती.

ए आय तंत्रज्ञान मनुष्याच्या आयुष्यात प्रत्येक क्षेत्रासाठी महत्वाचे आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात ए आय चा समावेश झाला आहे त्यामुळे शिक्षकांनी स्वतःला अपडेट करावे असे आवाहन उदघाटक संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मिलिंद बारहाते यांनी केले.याविषयी उपस्थित शिक्षक, संशोधक, विद्यार्थी यांना माहिती झाल्यास भारताचे उज्वल भविष्य घडेल या उद्देशाने हि परिषद आयोजित करव्यान आली होती.
परिषदेच्या अध्यक्षस्थानी श्री. दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा मा. किर्तीताई अर्जुन तर उद्घाटक म्हणून संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ मिलींद बारहाते हे लाभले होते. याप्रसंगी व्यासपीठावर धावेकर कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय देशमुख, प्राचार्य डॉ.माधुरी फुले, सचिव प्राचार्य डॉ. कमलाकर पायस, बीजभाषक म्हणून डॉ. वेंकट सतीश, मानवविद्या शाखेच्या अधिष्टाता डॉ. मोना चिमोटे, प्रशासकीय अधिकारी प्रा. डॉ.सचिन पंडित, परिषदेचे समन्वयक प्रा राहुल घुगे डॉ. नवल पाटील, उपप्राचार्य में प्रितेश पाटील, सहसमन्वयक डॉ. प्रवीण वानखडे हे उपस्थित होते.
तसेच परिषदेच्या इतर सत्रास संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक मा. नितीन कोळी, प्राचार्य डॉ आराधना वैद्य, प्राचार्य डॉ. डि टी. इंगोले, डॉ. दुर्गेश बोरसे व वक्ते म्हणून डॉ वेंकट सतीश, डॉ हरिष मालपानी, डॉ ज्ञानेश्वर ग टकर है उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते म्हणाले की हैदराबाद येथे गुगलच्या माध्यमातून ए आय साठी मोठा प्रोजेक्ट निर्माण करण्यात येत आहे. त्यामुळे युवकांना यामध्ये रोजगार उपलब्ध होईल इनोवेशन आणि एज्युकेशन हे सर्वात महत्त्वाचे झाले आहे. शासनाने विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध योजना सुरू केल्या आहेत स्टार्टअप च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना रोजगार मिळेल व नाविन्यपूर्ण प्रकल्प राबवून विद्यार्थी घडविण्यासाठी विद्यापीठ सतत प्रयत्न करत आहे. येणारे जग हे स्टार्टअप चे आहे यात 48% महिला स्टार्टअप मध्ये सहभागी आहेत, चांगल्या योजना शिक्षकांनी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवाव्यात व बदलत्या काळाची जाणीव ठेवून शिक्षकांनी स्वतःला बदलायला पाहिजे असे आवाहन देखील कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते यांनी याप्रसंगी केले.
परिषदेला एकूण ६०० पेक्षा जास्त संशोधन लेख प्राप्त झालेत व ते ‘रिसर्च नेबुला’ या संशोधन नियतकालिकेत प्रसिद्ध करण्यात आले. परिषदेला मोठ्या संख्येने प्राध्यापक नवसंशोधक, विद्यार्थी उपास्थित होते. या परिषदेच्या यशस्वी आयोजनाकरिता श्री धोवेकर कला महा खड़की, अकोला येथील प्रा.डॉ.नीता तिवारी, प्रा डॉ सुरेश पंडित, प्रा डॉ संगीता लोहकंपुरे, प्रा.डॉ संतोष मिसाळ, प्रा डॉ अमरीश गावंडे व तक्षशिला महाविधालय अमरावती येथील सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विध्यार्थ्यानी मोलाचे सहकार्य केले. परीषदेला लाभलेला उत्सुर्फ प्रतिसाद, अतिथी आणि वक्ते यांच्या विचार मंथनातून सदर परिषदेचा भारताचे उत्त्वल भविष्य घडविण्याचा उद्देश सार्थकी लागला हा आशावाद साप्रसंगी व्यक्त करण्यात आला सर्वाच्या आभाराने व राष्ट्रगीताने या परीषदेची सांगता करण्यात आली.
