महाविद्यालयास नॅक मूल्यांकन समितीची भेट
श्री. धाबेकार कला महाविद्यालयामध्ये दिनांक 9 व 10 डिसेंबर 2024 रोजी नॅक मूल्यांकन समितीने मूल्यांकनात्मक भेट दिली या समितीच्या अध्यक्षस्थानी मिझोरम येथील केंद्रीय विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. परवाकर राथ हे होते तर समन्वयक सदस्य म्हणून हैदराबाद येथील केंद्रीय विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. राघव रेड्डी चंद्री हे होते आणि सदस्य म्हणून नागालँड येथील प्राध्यापक डॉ.अनुग्ला अय्यर ह्या आल्या होत्या त्यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि आक्यूएसी समन्वयक प्रा. राहुल घुगे यांच्या नेतृत्वात महाविद्यालयाच्या विविध उपक्रमांचे आणि कार्यक्रमाचे तसेच महाविद्यालयात कार्यरत विविध विभागाची व महाविद्यालयाने राबवलेल्या समाज उपयोगी व सामाजिक हिताच्या उपक्रमांची पाहणी केली महाविद्यालयातील सुविधांची पाहणी करून समाधान व्यक्त केले