मराठी भाषा संवर्धन पंधरवडा प्रारंभ!

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा प्रारंभ! श्री धाबेकर कला महाविद्यालयात मराठी विभागामध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा या उपक्रमांतर्गत विविध उपक्रमांच्या संचालनाचे आयोजन करण्यात आले.मराठी भाषेच्या विकासाला चालना मिळावी ह्या दृष्टीने मराठी विभागाअंतर्गत सदैव नव उपक्रमांना प्राधान्य देण्यात येते. “माय मराठी” या विषयावर श्री धाबेकर कला महाविद्यालयात मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.संगीता लोहकपुरे होत्या .प्रमुख अतिथी मार्गदर्शक म्हणून सौ प्रतीक्षा शर्मा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

सदर व्याख्यानाच्या प्रास्ताविकपर मनोगतातून मध्ये मराठी विभाग प्रमुख प्रा. रेखा अढाव यांनी मराठी भाषेच्या संवर्धनाकरिता मराठी भाषेच्या वापराविषयी आग्रही राहून मराठी वाचन लेखन परंपरा समृद्ध करण्याविषयीचे कळकळीचे आवाहन केले .प्रमुख अतिथी प्रतिक्षा शर्मा यांनी मराठी भाषेच्या अमिटगोडी विषयीचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. सोबतच मराठी भाषेमध्ये जगातील उत्तमोत्तम साहित्य लिहिलेले असून विद्यार्थ्यांनी ह्या साहित्याचा सखोल अभ्यास करावा असे सांगितले.

व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी विराजमान असलेल्या प्राचार्य डॉ. संगीता लोहकपुरे यांनी आपल्या मार्गदर्शना मध्ये सांगताना म्हटले की, ‘अमृतातेही पैजा जिंकणारी मराठी भाषा अतिशय समृद्ध असून मराठी भाषेमुळे भारतीय सांस्कृतिक वैभवात भर पडली आहे असे सांगितले .सदर व्याख्यानपर कार्यक्रमाचे संचालन कुमारी प्रतिक्षा निकोले हिने केले तर आभार प्रदर्शन कुमारी अर्पिता चांदूरकर हिने केले.महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग याप्रसंगी उपस्थित होते.