मराठी भाषा संवर्धन पंधरवडा संपन्न
श्री धाबेकर कला महाविद्यालय मराठी भाषा संवर्धन पंधरवडा संपन्न श्री धाबेकर कला महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त कविता वाचनाचा कार्यक्रम घेण्यात आला ह्या कार्यक्रमाच्या प्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक डॉक्टर संतोष मिसाळ अध्यक्षस्थानी उपस्थित होते कार्यक्रमाला प्राध्यापक डॉक्टर सुरेश पंडित यांचीही उपस्थिती होती मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक रेखा आढाव यांनी आपल्या प्रास्ताविकपर मनोगतातून मधून मराठी भाषेच्या संवर्धनाकरिता विविध उपक्रमांची आवश्यकता महत्व सांगितले सदर कविता वाचनाच्या कार्यक्रमांमध्ये केशवसुतांची तुतारी नवा शिपाई वाशी मर्ढेकरांची भंगू दे काठिन्य माझे कवी बा भ बोरकर यांची जीवन त्यांना कळले हो आणि जिने गंगौघाचे पाणी सोबतच कुसुमाग्रज इंदिरा संत विंदा करंदीकर नारायण सुर्वे सुरेश भाट विठ्ठल वाघ ना धो महानोर कवयित्री कल्पना दुधाळ यांच्या कवितांचे वाचन करून रसग्रहण करण्यात आले
आपले अध्यक्षीय विचार व्यक्त करताना डॉक्टर संतोष मिसाळ यांनी कविता हे मानवाच्या जगण्याचा मूलभूत आधार असल्याचे व्यक्त केले कवितेच्या माध्यमातून कवी व्यक्ती ते समजते असा प्रवास करीत असतो कवितेमधून व्यक्त होणारे विचार भावना कल्पना ह्या समाजाचे प्रतिबिंबच आहेत कविता वाचनाच्या सदर उपक्रमास हार्दिक शुभेच्छा देऊन कवितेविषयी चे आपले स्नेहपूर्ण नाते त्यांनी उलगडून दाखविले विद्यार्थ्यांनी सदर कविता वाचनाच्या कार्यक्रमांमध्ये आनंदाने सहभागी होऊन बहारदार कवितावाचन सादर केले याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन दीपक जाधव याने केले तर आभार प्रदर्शन अक्षय इंगळे यांनी केले