मराठी भाषा संवर्धन पंधरवडा संपन्न

श्री धाबेकर कला महाविद्यालय खडकी अकोला येथे दिनांक 14 जानेवारी ते 28 जानेवारी दरम्यान मराठी भाषा संवर्धन पंधरवडा अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले या उपक्रमांतर्गत कविता वाचन ,व्याख्यान, तसेच चर्चासत्र, पुस्तक प्रदर्शन आणि उतारा वाचन इत्यादी अभ्यासपूर्ण उपक्रमांचे आयोजन करून विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषा विषयक अभिरुची संवर्धन होण्या संदर्भात प्रयत्न करण्यात आले .महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. नीता तिवारी, मराठी विभाग प्रमुख प्रा रेखा अढाव ,प्रा.अमरीश गावंडे ,प्रा. श्रीकांत पाटील, प्रा.डॉ.संतोष मिसाळ, प्रा. राहुल घुगे यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी आनंदाने, हिरीरीने प्रत्येक उपक्रमामध्ये सहभाग नोंदविला.

मराठी भाषेच्या संवर्धनाकरिता प्रत्येक विद्यार्थी- विद्यार्थिनींनी अतिशय डोळसपणे प्रयत्न करून माय मराठीच्या संवर्धनामध्ये आपला खारीचा वाटा उचलावा असे आवाहन प्राचार्य डॉ. निता तिवारी यांनी याप्रसंगी केले .मराठी भाषेच्या अंतरंगातील सौंदर्य आणि तिची उपयोगिता या विषयावर प्रा. रेखा आढाव यांनी आपले विचार व्यक्त करून उपयोजित मराठीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी अर्थार्जनाच्या विविध संधी शोधाव्या आणि त्याच्या माध्यमातून आपला सर्वांगीण विकास करावा असे आवाहन त्यांनी केले.