माँ जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी
खडकी : स्थानिक श्री. धाबेकर कला महाविद्यालय, खडकी येथे शारीरिक शिक्षण विभागातर्फे माँ जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी केली गेली. शारीरिक शिक्षण विभागातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी कार्यक्रमाच्या प्रमुख डॉ. नीता तिवारी यांनी दीपप्रज्वलन करून हार अर्पण केले. आपल्या प्रमुख मार्गदर्शनात त्यांनी युवकांपुढे जिजाऊ यांचा कणखरपणा व स्वामी विवेकानंद यांच्या कर्तृत्वावर प्रकाश टाकला.
शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डाँ. संगीता लोहकपुरे यांनी माँ जिजाऊ यांनी स्वराज्य निर्मितीचा विडा उचलून स्वराज्याचा लढा देण्यासाठी शिवबाला कशाप्रकारे तयार केले याचे उदाहरण देऊन त्यांच्या श्रेष्ठत्वाचे वर्णन केले. स्वामी विवेकानंद यांच्या जगाला दिलेली शिकवण, उठा जागे व्हा व ध्येयपूर्तीसाठी लढा हे सांगितले.
या प्रसंगी शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. संगीता लोहकपुरे यांनी दिनांक 12 जानेवारीला महाविद्यालयात कामानिमित्त उपस्थित विद्यार्थ्यांना नियमांचे पालन करून मास्कचे वाटप केले तसेच दिनांक 13 जानेवारीला महाविद्यालयात लसीकरण शिबिर आयोजित केले गेले. त्या डॉक्टर्सना मास्कचे वाटप केले व महाविद्यालयाच्या मार्गावरील शंभर नागरिकांना मास्कचे वाटप करून जनजागृती केली. याप्रसंगी कोरोना नियमावलीचे पालन करून विद्यार्थी उपस्थित होते तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचीही उपस्थिती यांचीही उपस्थिती याप्रसंगी होती.