आंतरराष्ट्रीय महीला दिन साजरा

स्थानिक खडकी श्री धाबेकर कला महाविद्यालय खडकी येथे आंतरराष्ट्रीय महीला दिन ८ मार्च ते १० मार्च ३ दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन शारिरिक शिक्षण विभागातर्फे डॉ. संगिता लोहकपुरे यांनी केले.

दि.८ मार्च रोजी प्राचार्या डॉ. तिवारी मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली “स्त्रिया व समाज” या विषयावर परिचर्चा घेण्यात आली. या प्रसंगी डॉ. तिवारी मॅडम यांनी पुर्व काळातील स्त्रियांचा दर्जा, स्थिती,शिक्षण विविध ठिकाणी गाजविलेले क्षेत्र यांचे आजपर्यंत झालेले बदल यांची सविस्तर माहीती सोदाहरणसहीत दिली. मॉ. जिजाऊ, सावित्रीबाई फुले राणीलक्ष्मीबाई, कल्पना चावला, इंदिरा गांधी,मदर टेरेसा, किरण बेदी ते आपल्या अर्थमंत्री निर्मला सितारमण यांच्या पर्यंत तसेच विविध पद्ममश्री अवार्ड विजेत्यांचेही उदाहरण देवुन व त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकला.

या प्रसंगी डॉ. संगिता लोहकपुरे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना आपण सर्व प्रथम स्त्रि आहे हे लक्षात ठेवुन समाजात जास्त आधुनिकतेच्या आधिन न जाता कुटुंब, समाज, देशाच्या गौरवाची जाण ठेवुन आपले वर्तन ठेवावे व आपल्या कलागुणानां जास्तीत जास्त विकसीत करुन ध्येय गाठावे असे सांगितले. दि ९ मार्च रोजी “प्राचीन काळातील थोर स्त्रिया” या विषयावर निबंध लेखन स्पर्धा घेतली. व दि, १० मार्च रोजी उत्कर्ष शिशु केंद्र व गायत्री बालिका आश्रम येथे भेट देवुन तेथील कामगार महिलांना भेट वस्तु देवुन महीला दिनी सत्कार केला.