आंतरराष्ट्रीय महिला दिवस संपन्न!!

श्री धाबेकर कला महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय महिला दिवस संपन्न!! श्री.धाबेकर कला महाविद्यालय खडकी, अकोला येथे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मराठी विभागाअंतर्गत विद्यार्थ्यांना ऑनलाइन मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले .मराठी विभाग प्रमुख प्रा. रेखा अढाव यांनी महाविद्यालयाच्या सन्माननीय प्राचार्य डॉक्टर संगीता लोहकपुरे यांच्या अध्यक्षतेखाली सदर कार्यक्रमाच्या आयोजनाचा, मार्गदर्शनाचा लाभ विद्यार्थ्यांना घेता आला .या व्याख्यानाला प्रमुख अतिथी सुनिता गोळे मॅडम संचालिका “वेल टोल कम्प्युटर “कौलखेड अकोला या होत्या. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना गोळे मॅडम यांनी महिला दिनाचे औचित्य साधून महिलांना खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर होण्याकरिता आत्मविश्वासाची गरज असणे आवश्यक असल्याचे सांगितले.

महिलांनी, विद्यार्थिनींनी स्वतःच्या अपेक्षा, आशा ,इच्छा यांचा स्पष्टपणे विचार करून स्वावलंबी असणे याकरिताच्या पात्रता धारण करणे आवश्यक असल्याचे सांगितले .अर्थार्जन करून प्रत्येक स्त्रीने स्वावलंबनाचा आनंद घेतला पाहिजे. आपल्या क्षमता योग्य तांचा सदुपयोग करून कुटुंब व्यवस्थेमध्ये, समाजव्यवस्थेमध्ये आपली जबाबदारीची भूमिका निभावणे आवश्यक आहे. याविषयी विद्यार्थिनींची विद्यार्थ्यांशी संवाद केला .आपल्या प्रास्ताविकपर मनोगतातून महिला दिना निमित्त सर्व विद्यार्थिनींना हार्दिक शुभेच्छा देऊन महिला दिन हा महिलांनी अतिशय जबाबदारीने सुविद्य होऊन, सुशिक्षित होऊन, सुसंस्कारित होऊन साजरा करणे अपेक्षित असल्याचे मत प्रा. रेखा अढाव यांनी व्यक्त केले. ऑनलाइन व्याख्यानाच्या अध्यक्ष महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर संगीता लोहकपुरे यांनी विद्यार्थिनींनी त्यांना उपलब्ध असलेल्या संधीचे सोने करावे असे आवाहन केले.

विद्यार्थिनींनी आपल्या शिक्षणाच्या आधारे महिलांचे अर्धे अवकाश अजूनही अंधारात आहे त्याला प्रकाश पुरविण्याचे काम करावे असे आवाहन केले. आणि विद्यार्थिनींच्या उज्वल भवितव्यासाठी आपल्या शुभेच्छा दिल्या .मराठी विभाग प्रमुख प्रा. रेखा अढाव यांनी वेलटाँल कम्प्यूटर च्या संचालिका सुनीता गोळे मॅडम यांचे हार्दिक आभार मानून ऑनलाइन व्याख्यानाच्या अध्यक्ष डॉक्टर संगीता लोहकरे मॅडम यांच्या अनुमतीने सदर व्याख्यानाला पूर्णविराम देण्यात आला