75व्या स्वातंत्र्य दिनाच्या पर्वावर विविध कार्यक्रमाचे आयोजन

भारतीय 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या पर्वावर महाराष्ट्र शासन परिपत्रक पत्रानुसार श्री धाबेकर कला महाविद्यालय खडकी येथे 15. 8 .2021 ते 17. 8. 2021 पर्यंत विविध कार्यक्रमाचे विविध विभागातर्फे आयोजन करण्यात आले होते. शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख व प्रभारी प्राचार्य डॉ. संगीता लोहकपुरे यांनी कोरोना रुग्ण यांचा महाविद्यालयातर्फे सत्कार केला. करोना रुग्ण यांचा महाविद्यालयातर्फे सत्कार केला. कोरोना योद्धा म्हणून दिपाली दिपक वानखडे व जयश्री डोडे जिल्हा सामान्य रुग्णालय परिचारिका यांचा श्रीफळ व बुके देऊन सत्कार केला याप्रसंगी त्यांनी आपल्याला आलेले बिकट प्रसंग, अनुभव सांगून हिमतीने कोरोनावर मात करण्याचे आवाहन केले. कोरोना रुग्ण श्री शिवानंद उमाळे, रेणुकाबाई लंगोटे यांना शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. रेणुकाबाई लंगोटे ह्या महाविद्यालयात हजर न राहू शकल्यामुळे त्यांचा सत्कार घरी जाऊन केला .

याव्यतिरिक्त राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संतोष मिसाळ यांनी गीत गायन स्पर्धा घेतली. यामध्ये 35 च्या वर स्पर्धकांनी भाग घेतला यामध्ये शुभांगी कांबळे प्रथम कल्याण लुले द्वितीय व अनुराग गडलिंग यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला. मराठी विभाग प्रमुख प्रा. रेखा आढाव यांनी व्याख्यानाचे आयोजन केले प्रा. माधुरी पाटील ह्या प्रमुख वक्त्या होत्या. त्यांनी स्वातंत्र्य समता बंधुता याविषयी सविस्तर माहिती दिली. याप्रसंगी 34 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. इतिहास विभाग प्रमुख सुरेश पंडित यांनी या 75व्या अमृत महोत्सव प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित केली ही स्पर्धा प प्राचार्य डॉ. संगीता लोहकपूरे यांच्या मार्गदर्शनाखाली व इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ.सुरेश पंडित यांच्या नेतृत्वात संपन्न झाली यामध्ये एकूण 80 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला प्रा.अमरीश गावंडे यांनी वाद विवाद स्पर्धा घेतली स्वातंत्र्याचे फलश्रुती झाली किंवा नाही हा या स्पर्धेचा विषय होता या कार्यक्रमात एकूण 35 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला त्यात प्रथम क्रमांक आचल ठाकूर यांनी प्राप्त केला.