जागतिक आरोग्य दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
स्थानिक खडकी येथील श्री धाबेकर कला महाविद्यालयात जागतिक आरोग्य दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले माजी प्राचार्य प्राचार्य व शारी. शिक्षण संचालक डॉ.संगीता लोहकपुरे यांच्या मार्गदर्शनात हेल्थ इज वेल्थ हा ऑनलाइन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या डॉ. वर्षा राव या होत्या. डॉ. वर्षा राव या प्रसिद्ध जिम ट्रेनर व होमिओपॅथिक डॉक्टर असून त्यांचाआरोग्य याचा गाढ अभ्यास आहे त्यांनी आपल्या मार्गदर्शना द्वारे विद्यार्थ्यांना शारीर क्रियाशील राहण्यासाठी आरोग्य चांगले रोग मुक्त जीवन जगण्यासाठी विविध उदा. सांगून आपल्या रुग्णांची व जिम मधील सभासदांचे अनुभव सांगितले शारीरिक जिभेचे चोचले सहन करताना होणाऱ्या दुष्परिणाम पासून दूर राहावे हे उदा. दाखल सांगितले
शारीरि शिक्षक संचालक डॉ. संगीता लोहकपुरे यांनी शरिर क्रियाशील राहण्यासाठी पर्याप्त प्रमाणात आहार व्यायाम निद्रा यांची गरज आहे विविध व्यायाम प्रकार जसे मॉर्निंग वॉक ,योगासने, जिम्नसियम, एरोबिक्स, कथक शास्त्रीय नृत्य, स्केटिंग, विविध क्रीडा प्रकार यामुळे शरीर क्रियाशील राहून कार्यक्षमता वाढविण्यास मदत होते. सात्विक आहारामुळे सर्व अंतर्गत संस्थांची कार्यक्षमता वाढते मन उत्साही राहते विविध अंगांमध्ये कार्य करण्यासाठी ऊर्जा मिळते शरीर लवचिक राहते ताकद व शक्ती वाढते डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी पिवळे खाद्यपदार्थ खाणे योग्य असते मागील दोन वर्षात कोरोनामुळे जीवनशैलीत आमूलाग्र बदल झाले आहे. स्वच्छतेकडे सात्विक आहाराकडे व इतर आरोग्यदायी बाबींकडे लक्ष देऊन. आपले व कुटुंबाचे स्वास्थ उत्तम ठेवण्यासाठी प्रत्येक जण व्यायामाकडे जास्त लक्ष देत आहे नुसत्या गोळ्या औषधी ने आरोग्य चांगले न राहता त्या पचविण्याची शारीरिक कार्यक्षमता असणे आवश्यक आहे या कार्यक्रमांतर्गत विविध हेल्थ क्लब व योगासने क्लास मध्ये covid-19 बद्दलच्या प्रश्नावली सोडून घेण्यात आले या कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. तिवारी यांनी शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. इतर महाविद्यालयातील प्राध्यापकांनीही उपस्थिती दर्शविली.