परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा

महाविद्यालयात इतिहास व परीक्षा विभागाच्या संयुक्त विद्यमाने परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली ही कार्यशाळा महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. संगीता लोहकपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. या कार्यशाळेची सुरुवात दीपप्रज्वलन व संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली .

या कार्यशाळेत प्रा.डॉ. सुरेश पंडित व प्रा. राहुल घुगे यांनी विस्तृतपणे मार्गदर्शन केले तसेच याप्रसंगी मार्गदर्शनानंतर विद्यार्थ्यांच्या असलेल्या अडीअडचणीचे सुद्धा याप्रसंगी निरसन करण्यात आले. या कार्यशाळेला मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्य शाळेच्या यशस्वितेकरिता महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सर्व सहकार्य केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. साक्षी कपले व आभार प्रदर्शन प्रा. डॉ. नीता तिवारी यांनी केले.