डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा

श्री धाबेकर कला महाविद्यालयात भारतीय राज्य संघटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्रामुख्याने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संगीता लोहकपुरे प्रा. डॉ. अमरीश गावंडे व प्रा. डॉ. सुरेश पंडित उपस्थित होते.यावेळी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. राहुल घुगे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रमुख वक्ते प्रा. डॉ. सुरेश पंडित व प्रा. डॉ. अमरीश गावंडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला तसेच प्राचार्य डॉ. संगीता लोहकपुरे यांनी आपले अध्यक्षीय भाषणात आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात प्रा.डा. संतोष मिसाळ प्रा. रेखा आढाव प्रा.श्रीकांत पाटील प्रा. स्वाती फाले आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. नीता तिवारी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.