डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
श्री धाबेकर कला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व अर्थशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पुजनाने करण्यात आली,
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉ .संतोष मिसाळ तर प्रमुख वक्ते म्हणून प्रा डॉ संदीप डोंगरे सर, कला व वाणिज्य महाविद्यालय ता. दर्यापूर जिल्हा अमरावती व कार्यक्रमाचे आयोजक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डॉ .नीता तिवारी उपस्थित होते स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त “भारतीय संविधान” या विषयावर डॉ. संदीप डोंगरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले,
डॉ .संतोष मिसाळ यांनी अध्यक्षीय भाषण व डॉक्टर बाबा साहेब आंबेडकरांचे कायदाविषयक कार्यावर प्रकाश टाकला कार्यक्रमाचे आयोजक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी व अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर नीता तिवारी यांनी बाबा डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांचे आर्थिक विचारावर प्रकाश टाकला डा. बाबासाहेब आंबेडकर हे एक मोठे अर्थत्ज्ञ होते.
कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक डॉक्टर सुरेश पंडित यांनी केले तर आभार प्रदर्शन कु. आम्रपाली खंडारे यांनी केले कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.