संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा
स्थानिक श्री धाबेकर कला महाविद्यालयात संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थी विकास व इतिहास विभागाच्या वतीने वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली. या वक्तृत्व स्पर्धेचा विषय: अंधश्रद्धा निर्मूलन काळाची गरज हा होता. ही स्पर्धा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संगीता लोहकपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली व इतिहास विभाग प्रमुख प्राध्यापक डॉ सुरेश पंडित यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. या स्पर्धेला परीक्षक म्हणून राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डॉक्टर निता तिवारी ह्या लाभल्या होत्या.स्पर्धेची सुरुवात दिपप्रज्वलन व संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. स्पर्धेच्या सुरुवातीला प्रास्ताविकातून प्रा. डॉ.सुरेश पंडित यांनी या स्पर्धेविषयी नियम सांगून महत्व पटवून दिले .
या प्रसंगी डॉ. संतोष मिसाळ यांनी संत गाडगेबाबा यांच्या दशसुत्री चे वाचन करून या दशसुत्री नुसार जीवन क्रम क्रमाची वाटचाल केली तर जीवन सुखद, सफल संपन्न होईल असा आशावाद व्यक्त केला. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संगीता लोहकपुरे यांनी सुद्धा आपल्या प्रबोधनात्मक व्याख्यानातून संत गाडगेबाबा यांच्या मानवतावादी विचाराचे प्रत्येक नागरिकाने रुजवणूक करून नवसमाज घडविण्याचे कार्य करावे हा संदेश दिला.
उपरोक्त स्पर्धेत एकूण आठ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी कु. निकिता राऊत यांनी प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक निखिल जामोदे व तृतीय क्रमांक कोमल बामणे यांनी पटकाविला. या स्पर्धेला मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते स्पर्धेच्या यशस्वी करिता महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले . या स्पर्धेची सांगता प्राध्यापक डॉ. अमरिश गावंडे यांनी आभार प्रदर्शनाने केली. स्पर्धेच्या शेवटी उपस्थित विद्यार्थ्यांच्या वतीने महाविद्यालय परिसर व रहिवासी परिसर येथे स्वच्छता करून खऱ्या अर्थाने संत गाडगेबाबा यांना आदरांजली वाहण्यात आली.