कोरोना विषाणू जनजागृती मोहीम

*श्री धाबेकर कला महाविद्यालय खडकी अकोला तर्फे कोरोना विषाणू जनजागृती मोहीम कोरोना वैश्विक महामारी च्या या संकट काळात महाविद्यालयातील रासेयो स्वयंसेवकांनी my govt/ pledge या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करून लॉक डाऊन च्या याकाळात stay home stay safe चे पालन करण्यासंदर्भात शपथ घेऊन आपली प्रतिबद्धता दर्शविली.

जवळपास 35 स्वयंसेवकांनी सोशल मीडियावर विविध माहिती पत्रक व बॅनर द्वारे जनजागृती /awareness करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण कार्य केले तसेच प्रत्येक स्वयंसेवकाने कमीत कमी पाच नातेवाईक मित्रांना सॅनिटायझर द्वारे हाथ धुणे .social disatancing पाळणे यासंदर्भात घ्यावयाची काळजी बाबत जनजागृती केली.

बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्यांच्या घराजवळ चौकात बंदोबस्तात असणाऱ्या पोलीस मित्रांना चहापाण्याची विचारपूस करून आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली तसेच ग्रामीण भागात असणाऱ्या गरीब कुटुंबांना आपल्या येतो शक्तीने धान्य वाटप करून , त्यांना मास्क वाटप करून शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या नियमांचे पालन करण्यासंदर्भात विनंती केली