पदवीदान समारंभ – 2023

विद्यापीठाच्या पत्रानुसार श्री धाबेकर कला महाविद्यालय येथे दि . 18 7 2023 रोजी घेण्यात आला या समारंभाचे आयोजन शारीरिक शिक्षण प्रमुख डॉ .संगीता लोहकपुरे यांनी केले.

सत्र 2022 च्या पदवीपात्र एकूण 17 विद्यार्थ्यांना या कार्यक्रमात पदवी प्रदान करण्यात आल्यायाप्रसंगी महा प्रमुख डॉ . निता तिवारी या अध्यक्षस्थानी होत्या सामाजिक कार्यकर्ते श्री शंकर भाऊ लंगोटे व श्री हुंडीवाले या प्रमुख प्रसंगी उपस्थित पाहुणे होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून मान्यवरांनी पूजन केले त्यानंतर प्रमुख पाहुण्यांना बुके देऊन महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ .निता तिवारी यांनी त्यांचे स्वागत केले. प्राचार्याचे स्वागत कार्यक्रमाचे आयोजक डॉ संगीता लोहकपूरे यांनी केले.
त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ . लोहकपूरे मॅडम यांनी केले त्यामध्ये विद्यार्थीदशेची अतिशय गौरवशाली बाब म्हणजे प्रथम वेळेची पदवी प्रत्येक विद्यार्थी आयुष्यात एकटप्पा गाठण्यासाठी प्रयत्नशील असतात. आजच्या संगणकाच्या युगात विद्यार्थ्यांची जिज्ञासा खूप वाढली आहे व त्यांच्या विविध प्रयत्नाद्वारे ते यशाचे शिखर गाठत आहेत. अशाच प्रकारचा एक टप्पा त्यांनी आज मिळवला आहे. त्याप्रसंगी त्यांचे स्वागत करताना आम्हालाही खूप आनंद होत. आहे त्यांनी भविष्यात खूप खूप यश मिळवावे अशा शुभेच्छा दिल्या.

महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ निता तिवारी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना नेहमी ध्येयाच्या प्राप्तीसाठी खूप खूप मेहनत करा तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुम्ही यशस्वी होत. नाही तसेच रोज नवीन स्वप्न पहा. स्वप्नपूर्तीसाठी खूप अभ्यास करा आजचे यश ये उद्याची नवीन पहाट आहे आज विज्ञानाने प्रगती करून तुम्हाला शिकवण्याच्या वाटा खूप प्राप्त झाल्या आहेत त्या नक्की प्राप्त करा व भविष्यात खूप मोठे व्हा अशा शुभेच्छा दिल्या.

माननीय पाहुण्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व त्यांना खूप मोठे व असा आशीर्वाद दिला सर्व १७ विद्यार्थ्यांनी पदवी घेतली व सध्या आपण काय करीत आहोत याची माहिती सांगितली व त्यांच्या अपेक्षा काय आहेत तेही सांगितले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन राहुल घुगे यांनी केले या कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व महा विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले. परत आम्ही पुन्हा कॉलेजला भेट देऊ व भविष्यात संपर्कात राहू असे सांगितले .