संविधान दिन साजरा

श्री धाबेकर कला महाविद्यालयात संविधान दिन साजरा. अकोला स्थानिक श्री धाबेकर कला महाविद्यालय येथे प्राचार्य डॉ. संगीता लोहकपुरे , राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ.संतोष मिसाळ , मराठी मराठी विभाग प्रमुख प्रा. रेखा आढाव व इंग्रजी विभाग प्रमुख प्रा.राहुल घुगे यांच्या प्रमुख उपस्थितीत संविधान दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजनाने व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. याप्रसंगी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.राहुल घुगे यांनी प्रास्ताविक करताना भारतीय संविधान निर्मिती तसेच भारतीय नागरिकांना संविधानामुळे मिळालेल्या अधिकारांची चर्चा केली कार्यक्रमास प्रमुख अतिथी प्रा. डॉ. संतोष मिसाळ यांनी संविधानामुळे या देशाची एकता व अखंडता अबाधित राखण्यात संविधानांचे अमूल्य योगदान आहे असे स्पष्ट केले. प्रा. रेखा अढाव यांनी याप्रसंगी संविधान निर्मात्यांनी समता स्वातंत्र्य बंधुता या मूल्यांवर आधारित भारतीय समाजाचे जे स्वप्न बघितले ते साकार झाल्याचे सांगितले. प्राचार्य डॉ.संगीता लोहकपुरे यांनी या प्रसंगी भारतीय राज्यघटना ही देशाला प्रगतीपथावर नेण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडत असल्याचे सांगितले. या प्रसंगी उद्देश पत्रिकेचे वाचन देखीलकरण्यात आले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. डॉ. अमरिश गावंडे यांनी केले.