मुख्यमंत्री सहाय्यता निधी
श्री धाबेकर कला महाविद्यालय खडकी,अकोला च्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधी
मागील मार्च 2020 असून संपूर्ण जगावर covid-19 जागतिक महामारीचे संकट कोसळले आहे मध्यंतरीच्या काळात ही लाट काही प्रमाणात कमी झाली होती परंतु फेब्रुवारी2021 पासून दुसऱ्या लाटेने भयंकर रौद्ररूप धारण करून जास्तीत जास्त तरुण पिढीचा यात बळी गेला आणि आता तिसरी लाटेची शक्यता लक्षात घेता या लाटेचा सामना करण्यासाठी सरकार पूर्ण तयारीनिशी सज्ज आहे महाराष्ट्र सरकारच्या या उपक्रमाला श्री संत ज्ञानेश्वर बहुउद्देशीय संस्था द्वारा संचालित श्री धाबेकर कला महाविद्यालय खडकी येथील सर्व कर्मचाऱ्यांनी या सहाय्यता निधीसाठी निधी जमा केला. प्राचार्य डॉ. संगीता लोहकपूरे यांनी मा. संजय खडसे साहेब (उपजिल्हाधिकारी)यांना हा निधी सुपूर्द केला.मागील वर्षीसुद्धा सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी शासनाच्या हाकेला ओ देऊन सामाजिक दायित्व म्हणून निधी दिला होता.