ऑनलाइन परीक्षा 2021

श्री धाबेकर कला महाविद्यालयातील बीए भाग 1 प्रथम सत्र, भाग-2 तृतीय सत्र, बीए भाग 3 पाचवे सत्र आणि ॲनिवल पॅटर्न बी.ए.भाग 3च्या ऑनलाइन परीक्षा दिनांक 12/05/2021पासून सुरू होत आहेत. ऑनलाइन परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांना वेळोवेळी दिलेल्या सूचनेनुसार तरी संबंधित विद्यार्थ्यांनी आपले ई-मेल आयडी आणि व्हाट्सअप नंबर जे महाविद्यालयाला दिलेले आहेत. ते स्वतःजवळ परीक्षेकरिता राहतील याची खबरदारी घ्यावी. परीक्षेकरिता विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा…

» Read more

बजेटवर परिचर्चा

श्री धाबेकर कला महाविद्यालय येथे अर्थशास्त्र विभागातर्फे “बजेटवर परिचर्चा” स्थानिक – श्री धाबेकर कला महाविद्यालय, खडकी,अकोला येथे आज अर्थशास्त्र विभागातर्फे “बजेटवर परिचर्चा” ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाची शुरुवात संत गाडगेबाबा यांच्या पूजनाने करण्यात आली. अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ. नीता तिवारी यांनी विद्यार्थ्यांना वित्तमंत्री द्वारे सादर केलेल्या बजेट संदर्भात माहिती दिली व समजावून सांगितलं. या परिचर्चा मध्ये महाविद्यालयाचे विद्यार्थी […]

» Read more

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा संपन्न

श्री धाबेकर कला महाविद्यालय मराठी भाषा संवर्धन पंधरवडा संपन्न श्री धाबेकर कला महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त कविता वाचनाचा कार्यक्रम घेण्यात आला ह्या कार्यक्रमाच्या प्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक डॉक्टर संतोष मिसाळ अध्यक्षस्थानी उपस्थित होते कार्यक्रमाला प्राध्यापक डॉक्टर सुरेश पंडित यांचीही उपस्थिती होती मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक रेखा आढाव यांनी आपल्या प्रास्ताविकपर मनोगतातून मधून मराठी भाषेच्या संवर्धनाकरिता विविध उपक्रमांची आवश्यकता महत्व […]

» Read more

रस्ता सुरक्षा नियमांचे मार्गदर्शन पथनाट्य व रॅलीद्वारे जनजागृती

श्री धाबेकर कला महाविद्यालयात रस्ता सुरक्षा नियमांचे मार्गदर्शन पथनाट्य व रॅलीद्वारे जनजागृती स्थानिक श्री धाबेकर कला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना च्या वतीने प्राचार्य डॉ. संगीता लोहकपुरे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. राहुल घुगे यांच्या मार्गदर्शनात रस्ता सुरक्षा नियमांचे मार्गदर्शन करण्यात आले. या प्रसंगी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री विनोद जिजकार प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने तसेच […]

» Read more

जागतिक महिला दिनाचे सफल आयोजन

खडकी : स्थानिक श्री धाबेकर कला महाविद्यालय, खडकी-अकोला येथे शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख व प्रभारी प्राचार्य डॉ. संगीता लोहकपुरे यांनी तीन दिवसीय जागतिक महिला दिनाचे आयोजन केले होते. दिनांक ६ मार्च २०२१ रोजी “जागतिक महिला दिन” या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन केले गेले. यात महाविदयालयाच्या विद्यार्थिनींनी उत्स्फुर्तपणे सहभागी होत आपले निबंध ऑनलाइन पद्धतीने पाठविले. दिनांक ८ मार्च २०२१ रोजी महाविद्यालयामध्ये […]

» Read more

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा प्रारंभ!

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा प्रारंभ! श्री धाबेकर कला महाविद्यालयात मराठी विभागामध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा या उपक्रमांतर्गत विविध उपक्रमांच्या संचालनाचे आयोजन करण्यात आले.मराठी भाषेच्या विकासाला चालना मिळावी ह्या दृष्टीने मराठी विभागाअंतर्गत सदैव नव उपक्रमांना प्राधान्य देण्यात येते. “माय मराठी” या विषयावर श्री धाबेकर कला महाविद्यालयात मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.संगीता लोहकपुरे होत्या .प्रमुख अतिथी मार्गदर्शक […]

» Read more

संविधान दिन संपन्न

स्थानिक :खडकी अकोला, श्री. धाबेकर कला महावि्यालयात दी. 26 नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने कार्यक्रम संपन्न झालाहा कार्यक्रम महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संगीता लोहकपुरे, यांच्या मार्गदर्शनाखाली व डॉ संतोष मिसाळ, डॉ सुरेश पंडित यांच्या उपस्थितीत संपन्न झाला या प्रसंगी भारतीय संविधानाच्या उद्देशपत्रिकेचे वाचन करण्यात आले व शुभेच्छा पर संदेशातून संविधानाच्या रक्षणार्थ कटबद्द राहण्याचा संकल्प करण्यात आला.

» Read more

संविधान दिन साजरा

श्री धाबेकर कला महाविद्यालयात संविधान दिन साजरा खडकी अकोला : स्थानिक श्री धाबेकर कला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना च्या वतीने प्राचार्य डॉ. संगीता लोहकपुरे, रा.से. यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. राहुल घुगे व समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा. अमरिश गावंडे यांच्या उपस्थितीत संविधान दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजनाने व दीप प्रज्वलनाने करण्यात […]

» Read more
1 3 4 5 6