करिअर कट्टाचे उदघाटन

श्री धाबेकर कला महाविद्यालय खडकी अकोला येथे महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करियर कट्टा या उपक्रमाचे उद्घाटन व उपक्रमास प्रारंभ झाला. याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर संगीता लोहकपुरे, महाविद्यालयाच्या करिअर कौन्सेलिंग सेल प्रमुख तसेच करियर कट्टा समन्वयक प्रा. रेखा अढाव, प्रा. डॉक्टर नीता तिवारी यांच्यासह प्राध्यापक डॉक्टर सुरेश पंडित ,प्राध्यापक डॉक्टर संतोष मिसाळ, प्राध्यापक डॉक्टर अमरीश गावंडे ,प्राध्यापक राहुल घुगे यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते .सदर उपक्रम हा रोजगाराभिमुख असून या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना करिअर संदर्भात असलेल्या विविध संधींची माहिती उपलब्ध होणार आहे.

करियर कट्टा या उपक्रमाच्या माध्यमातून आय ए एस आपल्या भेटीला तसेच उद्योजक आपल्या भेटीला असे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त व नियमित मार्गदर्शन पर वर्ग अगदी नाममात्र शुल्कामध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. सदर करियर कट्टा च्या उपक्रमांवर हे विद्यार्थ्यांना ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे. ऑनलाइन उपक्रमाकरिता विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्यानंतर विविध ऑनलाइन कोर्सेस संदर्भात तसेच अनेक तज्ञ मार्गदर्शकांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळणार आहे .अगदीअल्प खर्चामध्ये शासनाने सुरू केलेल्या सदर उपक्रमांचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा नि आपल्या यशस्वी कारकिर्दीस प्रारंभ करावा असे आवाहन प्राचार्य डॉक्टर संगीता लोहकरे यांच्यासह करिअर कट्टा समन्वयक प्राध्यापक रेखा आढाव आणि डॉक्टर प्राध्यापक नीता तिवारी यांनी केले आहे. नाविन्यपूर्ण अशा या कार्यक्रमा मध्ये विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवून ऑनलाइन शिक्षण प्रणालीच्या माध्यमातून विद्यार्थी जिथे असतील तिथून शिकण्याची ही संधी स्वीकारावी आणि संधीचे सोने करावे कार्यक्रमाच्या शेवटी करियर कट्टा समन्वयक प्राध्यापक रेखा आढाव यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.