बजेटवर परिचर्चा

श्री धाबेकर कला महाविद्यालय येथे अर्थशास्त्र विभागातर्फे “बजेटवर परिचर्चा” स्थानिक – श्री धाबेकर कला महाविद्यालय, खडकी,अकोला येथे आज अर्थशास्त्र विभागातर्फे “बजेटवर परिचर्चा” ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाची शुरुवात संत गाडगेबाबा यांच्या पूजनाने करण्यात आली. अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ. नीता तिवारी यांनी विद्यार्थ्यांना वित्तमंत्री द्वारे सादर केलेल्या बजेट संदर्भात माहिती दिली व समजावून सांगितलं.

या परिचर्चा मध्ये महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते. त्यांनी बजेट संदर्भात आपले मत व्यक्त केले. काही वस्तू स्वस्त झालेली आहे. जसे सोने, चांदी, मौल्यवान धातु उदाहरणार्थ प्लॅटिनम हे महाग व्हायला  पाहिजे कारण ह्या वस्तुंची खरेदी श्रीमंत वर्ग जास्त करते हे. ही वस्तू कितीही महाग झाली तरीही त्यांची खरेदी थांबत नाही कारण ते त्यांचा प्रतिष्ठेची वस्तु असते. विद्यार्थ्यांनी अशाप्रकारे आपले मत व्यक्त केले आणि अध्यक्षीय भाषण प्राचार्या डॉ. संगीता लोहकपुरे यांनी दिले. या कार्यक्रमात कु. आम्रपाली खंडारे, नम्रता ठाकरे, दीप्ती दूधंबे, दीक्षा इंगोले, निशा ढारोटे आदि विद्यार्थ्यांनी आप-आपले मत व्यक्त केले.