पुस्तक प्रकाशन सोहळा

श्री धाबेकर कला महाविद्यालय खडकी, अकोला येथे आज दिनांक ५ फेब्रुवारी २०२४ रोजी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावतीच्या बी.ए. भाग १ सत्र २ या वर्गाकरिता लागू असलेल्या अभ्यासक्रमावर आधारित “भारताचा इतिहास” या इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. सुरेश पंडित लिखित इतिहास विषयाच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली तसेच महाविद्यालयात कार्यरत प्राध्यापकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. पुस्तक प्रकाशन नंतरच्या आपल्या मनोगतातून महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. संजय देशमुख यांनी पुस्तक लेखकाचा सत्कार व अभिनंदन करून तसेच त्यांना शुभेच्छा देऊन, निश्चितच हे पुस्तक बीए भाग १ च्या विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या दृष्टिकोनातून उपयुक्त व दिशादर्शक ठरेल हा आशावाद व्यक्त केला.

याप्रसंगी पुस्तकाचे लेखक प्रा . डॉ.सुरेश पंडित यांनीही आपले विचार मांडताना महाविद्यालयाचे प्राचार्य व समस्त सहकारी प्राध्यापक यांनी सातत्याने दिलेल्या प्रेरणेतूनच ही पुस्तक लेखनाची प्रक्रिया मी पूर्ण करू शकलो. परीक्षेला सामोरे जाताना या पुस्तकाच्या अभ्यासातून इतिहास विषय सोपा होईल. असे मत व्यक्त केले . याप्रसंगी उपस्थितांनी त्यांनी सुद्धा लेखकांचे अभिनंदन करून त्यांना भावी जीवनाच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्यात. सर्वांचे आभार म्हणून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.