सूक्ष्म अर्थशास्त्र पुस्तकाचे विमोचन

श्री धाबेकर कला महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. नीता तिवारी यांच्या सूक्ष्म अर्थशास्त्र पुस्तकाचे विमोचन। खडकी , अकोला स्थानिक श्री धाबेकर कला महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर नीता तिवारी यांच्या सूक्ष्म अर्थशास्त्र पुस्तकाचे विमोचन महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर संगीता लोहकपुरे यांच्या हस्ते करण्यात आले प्राध्यापक नीता तिवारी यांनी बीए भाग एक सत्र -1च्या विद्यार्थ्यांकरीता संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने निर्धारित केलेल्या अभ्यासक्रमानुसार सूक्ष्म अर्थशास्त्र पुस्तकाचे स्वतः लेखन केले,या पुस्तकामध्ये बीए भाग 1 सत्र 1 च्या अभ्यासक्रमानुसार महत्त्वाच्या संकल्पना चे अत्यंत सोप्या भाषेत व सरळ भाषेत विश्लेषण केले आहे , विद्यार्थी वर्गाला कठीण वाटणारा विषय सहजतेने समजून तो सोपा वाटेल अशी खात्री वाटते असे विचार प्राचार्य डॉक्टर संगीता लोहकपुरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले, पुस्तक लेखनासाठी श्री धाबेकर कला महाविद्यालय
खडकी चे अध्यक्ष , आदरणीय श्री अनिल भाऊ धाबेकर व सचिव आदरणीय श्री सिद्धार्थ भाऊ पाटील यांनी प्रेरणा दिली आणि प्राचार्य डॉक्टर संगीता लोहकपुरे यांचेही सहकार्य लाभले या सर्वांच्या सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार मी व्यक्त करते आसे विचार प्रा डॉ ‌नीता तिवारी यांनी व्यक्त केले.