श्री. धाबेकर महाविद्यालयास NAAC कडून B grade
महाविद्यालयाच्या नॅक मूल्यांकन समितीने दिनांक ९ व १० डिसेंबर २०२४ भेट दिली. भेटी दरम्यान महाविद्यालयातील सुविधांची आणि उपक्रमांची पाहणी केली व समाधान व्यक्त केले. NAAC मूल्यांकन प्रक्रियेतील सर्व घटकाच्या श्रमाचे योगदानाची फलश्रुती म्हणून महाविद्यालयास “B” श्रेणी चे मानांकन मिळाले.
या मानांकना करिता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय देशमुख सर यांनी संस्थेचे अध्यक्ष मा. अनीलभाऊ पाटील धाबेकर,सचिव मा.सिद्धार्थ पाटील, उपाध्यक्ष मा. हर्षलभाऊ पाटील यांनी दिलेले योगदान आणि केलेले सहकार्य याकरिता संस्थेचे मनस्वी आभार व्यक्त केली.
तसेच महाविद्यालयात कार्यरत सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी आणि नॅक समिती यांचे आभार व्यक्त केले. महाविद्यालय यापुढे असेच प्रगतीचे उपक्रम आणि कार्यक्रम करत राहील अशी आशा व्यक्त केली. NAAC मूल्यांकन प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करण्याकरता महाविद्यालयातील NAAC समन्वयक प्रा. राहुल घुगे यांनी सर्वस्वी योगदान दिले. महाविद्यालयास मिळालेल्या या यशा करिता सर्वांकडून महाविद्यालयाचे अभिनंदन होत आहे