डॉ एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचना प्रेरणा दिन
श्री धाबेकर कला महाविद्यालयातील बीए भाग 1 ,2 आणि 3 च्या विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की 15 ऑक्टोबर 2020 रोजी डॉ एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचना प्रेरणा दिन म्हणून आपण साजरा करणार आहोत. तरी वरील तीनही वर्गाच्या विद्यार्थ्यांनी झूम ॲप द्वारे ऑनलाईन पद्धतीने वाचन प्रेरणा दिनाच्या व्याख्यानाचा लाभ घ्यावा .मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक रेखा आढाव यांच्या सूचनेवरून सदर माहिती आपणाकडे प्रसारित करीत आहोत. झूम अॅप ची मिटिंग सकाळी 10:30 सुरू होईल सन्माननीय प्राचार्य डॉक्टर संगीता लोहटपुरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी अधिकाधिक संख्येने ऑनलाइन द्वारे उपस्थित रहावे. सदर मिटिंग ची लिंक आपणास व्हॉट्सॲप ग्रुप वर पाठविण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.
मराठी विभाग प्रमुख: प्रा.रेखा अढाव