आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत विविध कार्यक्रम संपन्न

श्री धाबेकर कला महाविद्यालय येथे “आजादी का अमृत महोत्सव” अंतर्गत विविध कार्यक्रम संपन्न…
स्थानिक खडकी येथे श्री धाबेकर कला महाविद्यालय खडकी येथे महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानानुसार आजादी का अमृत महोत्सव याअंतर्गत दिनांक ०८/०८/२०२२ते१७/०८/२०२२पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
प्राचार्य डॉ . निता तिवारी प्रा . डॉ. संगीता लोहकपुरे व डॉ. सुरेश पंडीत यांनी वरील उपक्रम एकत्रितपणे राबविले ०८/०८/२०२२ला महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता लसीकरण ०९/०८ /२०२२ क्रांती दिनानिमित्त थोर पुरुषांच्या फोटोची प्रदर्शनी व रांगोळी प्रदर्शनी 12 तारखेला अमली पदार्थ व तंबाखू मुक्त अभियान, 13 तारखेला घरघर तिरंगा व तीन दिवसीय झेंडावंदन जिल्हास्तरीय N.S.S रॅली, 14 तारखेला विभाजन विभीषिका दिन , 15 ला वृक्षारोपण व महाविद्यालयाच्या स्तरावर शारीरि. शि. विभागाद्वारे रॅली, N.S.S तर्फे पथनाट्य, निबंध स्पर्धा, दिनांक 17 ऑगस्टला सामूहिक राष्ट्रगान पूर्ण महाराष्ट्रात ठीक ११ वाजता व महाविद्यालयात आणि परिसरात राबविण्यात आले.
याप्रसंगी शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. लोहकपुरे यांनी तंबाखू विरोधी शपथ सर्व कर्मचाऱ्यांनी दिली. तसेच सर्व कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभाग घेऊन शिस्तीमध्ये सर्वांचा सहभाग घडवून आणला . महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. तिवारी यांनी सर्व उपक्रमाची थोडक्यात माहिती दिली वरील सर्व कार्यक्रम यशस्वी करण्या करिता महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी मोलाचे योगदान दिले.







